दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे बळ, आळंदीत २२ नोव्हेंबरला मोफत जयपूर फूट शिबिर….

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : मागील अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब यांच्यावतीने आळंदी येथे मोफत जयपुर फूट (कृत्रिम हात व पाय ) मोजमाप शिबिर आयोजित आळंदी येथील आवारी हाॅस्पिटल येथे बुधवार, दिनांक २२ नोव्हेंबर रोजी करण्यात आले असून, त्यासाठी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे आवाहन लायन्स चे प्रांतपाल विजय भंडारी, जयपूर फुटचे शैलेश बुरसे व आवारी हाॅस्पिटलच्या डॉ.ज्योत्स्ना आवारी यांनी केले आहे. 

            अपघात अथवा आजारामुळे पाय गमावलेल्या अपंग महिला आणि पुरुषांना पुन्हा त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी हा उपक्रम लायन्स क्लब च्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. गमावलेल्यांना कृत्रिम अवयवांचे बळ मिळून आयुष्यात नवी उमेद जागविण्याचे काम यानिमित्ताने होणार आहे. शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून आवश्यक कृत्रिम अवयवांचे माप घेतले जाईल. त्यानंतर काही दिवसांनंतर कृत्रिम अवयवांचे वितरण केले जाईल. 

           मधुमेह रक्तवाहिन्यांचे आजार, गँगरीन, अपघात आणि इतर कारणांमुळे हात-पाय गमविण्याची वेळ काहींवर येते. अशा व्यक्तींना दैनंदिन जीवन जगताना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र कृत्रिम हात-पाय बसवल्याने संबंधित व्यक्ती व्यवस्थित कामे करू शकते. हे कृत्रिम अवयव वापरण्यास अत्यंत सोपे असतात. या कृत्रिम अवयवांमुळे अगदी पूर्वीप्रमाणे व्यक्ती चालू शकतो, सर्व कामे करू शकतो. या अवयवांच्या मदतीने अगदी सायकल, रिक्षा चालविण्यासह ॲथलेटिक्स, खेळ आणि नृत्यातही सहभागी होता येते. तरी सर्व दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. ज्योत्स्ना आवारी यांनी केले आहे.

नोंदणी करण्यासाठी संपर्क

– कृत्रिम अवयव घेणे आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना शक्य होत नाही. मात्र या शिबिराच्या माध्यमातून हे कृत्रिम अवयव मिळणे शक्य होणार आहे.

– शिबिरात सहभागी होण्यासाठी ९८५०००५५७६२ व ९८२२३३९८२५ या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.