भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी…
धानोरा तालुक्यातील निमगाव वरुन रांगी गावाला जोडणारी विद्युत वाहिनी सध्या बॅकफीड बॅकलाइनद्वारे तात्पुरत्या स्वरूपात पुरवली जात आहे. यामुळे रांगी गावामध्ये सतत कमी व्होल्टेजचा त्रास सहन करावा लागत असून संपूर्ण लाईन डीम होत आहे.
या परिस्थितीमुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः घरगुती व शेतीविषयक उपकरणांवर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे रांगी ते निमगाव दरम्यान असलेली मुख्य लाईनवरील बिघाड तात्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी येथिल गावकऱ्यांनी केली आहे.
या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी असून, जर लवकरात लवकर ही लाईन पूर्ववत करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सोनू पठाण, महेश दुगे, दिनेश चापले, जावेद सय्यद,स्वराज कन्नाके , खुशाल वालदे ,प्रेम उंदिरवाडे,शमीरखाँ पठाण यांनी आंदोलन चा इशारा दिला आहे.



