युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
ग्रामविकास व पंचायतराज विभाग, जिल्हा परिषद अमरावती तथा पंचायत समिती दर्यापूर यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन कृषी भवन सभागृह दर्यापूर येथे नुकतेच करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे पावत्व तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब रायबोले होते. प्रमुख उपस्थिती गटविकास अधिकारी सि.जे.ढवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीकृष्ण कराळे, चिखलदऱ्याचे विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात, छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर गटविकास अधिकारी सि. जे. ढवक यांनी सदर अभियानाची पार्श्वभूमी, उद्दिष्टे, विविध घटक, अभियानाचा कालावधी तसेच अभियान दरम्यान ग्रामपंचायती व संबंधित यंत्रणांनी पार पाडावयाच्या भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला ग्रामपंचायत अधिकारी सुरज भोपसे, संजय चव्हाण यांनीही शासन निर्णयाबद्दल मार्गदर्शन केले.त्यानंतर सदर अभियांना विषयी संखोल माहिती उपस्थित असलेले सर्व सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, रोजगार सेवक यांना देण्यात आली. कार्यक्रमा यशस्वी पार पाडण्यासाठी संदीप देशमुख, राजकुमार चांदुरकर, सागर कराळे, शिवाजी ठाकरे, जोत्सना खवले, सतिश पाटील, विजय काकड, दिनेश टोळे, सचिन कोरडे, आशिष गवई, विलास यादव, विकास घाटे, पंकज नागे, प्रविण पाचघरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन सुनिल स्वर्गीय यांनी तर आभार प्रदर्शन संजय भांडे यांनी केले.



