Home Maharashtra मौजा कुसुंबी येथील २४ आदिवासी शेतकरी बांधवांचा ४२ वर्षांतंर्गत न्याय लढा होणार...

मौजा कुसुंबी येथील २४ आदिवासी शेतकरी बांधवांचा ४२ वर्षांतंर्गत न्याय लढा होणार यशस्वी… — तलाठी विनोद खोब्रागडे व शेतकऱ्यांचा कायदेशीर आत्मविश्वास अन्यायावर विजय मिळवून जाणार….

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादीका 

      गेल्या ४२ वर्षांपासून न्याय आणि हक्कासाठी लढा देणाऱ्या जिवती तालुक्यातील कुसुंबी येथील २४ आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या आत्मविश्वासाला अखेर यश मिळाले आहे.या लढ्यात कायदेतज्ञ तलाठी विनोद खोब्रागडे याचे मोलाचे योगदान आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

       माणिकगड सिमेंट कंपनी (आता अल्ट्राटेक सिमेंट) विरोधात सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेल्या अपीलवर विभागीय आयुक्त, नागपूर यांनी २७ मार्च २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला.

      यानंतर ९ सप्टेंबर २०२५ रोजी कंपनी व शेतकऱ्यांमध्ये झालेल्या अंतिम बैठकीत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत शेतीचा मोबदला,घरांचा मोबदला आणि नोकरी देण्याचे मान्य करण्यात आले.

      आदिवासी शेतकऱ्यांचा हा लढा १९८३ पासून सुरू होता.सन २०१३ पासून विनोद खोब्रागडे यांनी या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कनिष्ठ न्यायालयापासून ते उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला.

       अखेर त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले.या बैठकीत झालेल्या ठरावानुसार शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे मोबदला मिळणार आहे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १० लाख रुपये जमिनीचा मोबदला आणि प्रति घर १ लाख रुपये नुकसानभरपाई,तसेच प्रत्येक कुटुंबातील दोन व्यक्तींना नोकरी देण्यात येणार आहे. 

        संबधित शेतकऱ्यांनी तात्काळ खाते उघडण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले असून शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळणार आहे.