Home शैक्षणिक इंजिनिअर्स डे निमित्त महाविद्यालयात विशेष कार्यक्रम…

इंजिनिअर्स डे निमित्त महाविद्यालयात विशेष कार्यक्रम…

  चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

साकोली :- ब्रम्हानंद करंजेकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, साकोली येथे इंजिनिअर्स डे निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

        कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री. दहापुते सर, प्राचार्य – आय.टी.आय. कॉलेज, साकोली हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेश फुंडे सर यांनी भूषविले.

        यावेळी सी.डब्ल्यू. विभाग प्रमुख श्री. राकेश भुरे सर, सिव्हिल विभाग प्रमुख काशिवार मॅडम तसेच इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख पायल टेभुर्णे मॅडम यांचीही उपस्थिती लाभली.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राची फुंडे मॅडम यांनी करून स्वागतपर भाषणातून इंजिनिअर्स डेचे महत्त्व स्पष्ट केले.

          या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात games, पोस्टर स्पर्धा, क्विझ स्पर्धा तसेच वादविवाद (debate) या स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदवला.

        मुख्य अतिथी दहापुते सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजचा इंजिनिअर हा केवळ नोकरीसाठी नव्हे तर समाजातील समस्या सोडवण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी योगदान देण्यासाठी तयार झाला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून नावीन्यपूर्ण प्रकल्प हाती घ्यावेत.”

         अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शैलेश फुंडे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना सांगितले की, “इंजिनिअर्स हे राष्ट्राच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आहेत. आपल्या मेहनतीतून व नवोन्मेषी दृष्टिकोनातून समाजात बदल घडवण्याची ताकद इंजिनिअर्समध्ये आहे.”

          या कार्यक्रमाला सायली भोवते, पायल टेंभुर्णे, योगेंद्र लंजे, शुभांगी राणे, अजय गायधने, रोशन भिवगडे, शुभम कांबळे, अक्षय इटवाले यांसह इतर शिक्षक व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

         कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शुभांगी पारधीकर मॅडम यांनी केले.