Home Vidarbha सती नदीवर तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या रपट्याने नागरिकांचे आवागमन सुरु…

सती नदीवर तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या रपट्याने नागरिकांचे आवागमन सुरु…

     राकेश चव्हाण 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा 

       कुरखेडा शहरालगत सती नदीच्या नवीन पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले होते.त्या बांधकामाला अनुसरून वाहतुकी करिता तात्पुरता कच्चा रपटा तयार करण्यात आला होता.

         मात्र,पहिल्याच पाण्याने रपटा वाहुन गेल्याने नागरिकांचे आवागमन बंद झाले होते.परंतु नदीचे पाणी कमी झाल्याने पुनः रपटा बांधकाम सुरु करण्यात आले व आज पासुन रपटा आवागमन करण्यास सुरुवात झाली.

      यामुळे पायी येणारऱ्यां नागरिकांना,दुचाकी वाहनधारकांना व हलके चारचाकी वाहनधारकांना,रपटा बांधकामामुळे आवागमन करण्यास सोयीस्कर झाले आहे.

        आवागमना संबंधाने होणारा त्रासापासुन सध्या तरी नागरिकांची सुटका झाली आहे.,”त्यांच्या तोंडून अखेर गणपती बाप्पा पावला असे शब्द निघत आहेत…