एका आमदाराचा अपमान साऱ्या मसतदारसंघाचा अपमान. एक आमदार बदनाम सारा मतदारसंघ बदनाम.
आजची महाराष्ट्र विधानसभा म्हणजे चड्डी बनियान गँगगृह,आजचे आमदार म्हणजे निर्लज्ज (ज्यांना आम्ही प्रत्यक्ष निवडून देतो)…
आजचे आमदार महिला आमदारांसमोर एकमेकांची आईबहीण काढणारे असल्याने आजचे आमदार म्हणजे लिंगपिसाट टोळीचे सदस्य आहेत काय?,कुणाचाच कुणाला उधार ( तात्पुरता ) आदर,सन्मान नाही……
केवळ सत्तेसाठी सर्व हद्द पार करणाऱ्या नवऱ्याची रखेल होण्यास प्रत्येकजण उत्सुक……
केवळ पैश्यासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा एवढेच समीकरण.आणि या समीकरणाभोवती सारी विधानसभा,विधानपरिषद, सरकार,राज्यातील नगरसेवक, सनदी अधिकारी,इतर प्रशासकीय यंत्रणा सर्वकाही महाराष्ट्राला संपवून टाकण्याची जणूकाही स्पर्धा निर्माण केली. असा आज महाराष्ट्र केल्या गेला आहे.!!
महाराष्ट्रीयन जनता मात्र या सर्वांचा तोंड दाबून मुक्याचा मार सहन करत आहे.
आम्ही जनसुरक्षा कायदा आणणार.हे फडणवीसने भाजपच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात लिहिले होते का?
उलट आमचे (भाजपचे )सरकार आले तर लाडक्या बहिणीचे 1500 च्या ऐवजी 2400 रुपये देऊ ही घोषणा असताना, आज 1500 साठी पात्र / अपात्रतेनुसार लाखो महीलांचे 1500 सुद्धा बंद केले!
एकवेळ अशी येईल की जसे बिहारचे कामगारांचे लोंढे महाराष्ट्रात येतात. तसे महाराष्ट्राचे लोंढे गुजरातला जातील.
एकंदरीत या सर्व महाराष्ट्राच्या हलाखीला येथील प्रत्येक सुशिक्षित आणि महाराष्ट्रीयन जबाबदार आहे!
कारण…….
आम्हाला या राजकारण्यांच्या (आमदार, खासदार) एकमेकांच्या पक्षातील बाप बदलणाऱ्या माकडी कोलांटउड्या पाहण्यात जास्तच इंटरेस्ट असतो. आणि हिजड्यासारखे टाळ्या वाजवत आम्ही मजा घेतो (यात अनंत भवरे पहिला) जणूकाही मोठा तीर मारला.एखादा आमदार,खासदार,नामदार (आजीमाजी,) निवडणुकीच्या ऐन तोंडावर एखादा बाप बदलण्याची घोषणा करतो. आणि कार्यकर्त्याची मते जाणून घेण्यासाठी मेळावा घेतो.तिथे जणूकाही सीमेवरुन जवान युद्ध जिंकून आलाय आणि त्याचा सत्कार ठेवलाय…
निवडणुका झाल्या की तो पडतो की मग संपर्क कार्यालयात माशा मारायला सुद्धा कुणी येत नाही.जे शरमिंधे असतात ते हजरी लावतात आणि दोन्ही तिरावर पाय ठेऊन काही दिवसांनी एक पाय हळूच उचलून घेतात.
असा आज महाराष्ट्र आम्ही नेऊन ठेवलाय….
भाजप आणि मित्रपक्षाने 500 च्या नोटांचे बंडल,बंडलांच्या बॅगा वाटल्या (त्यातली एक बॅग, बॅगवाल्यासोबत चड्डी बनियानवर साऱ्या देशाने पाहिले). नालासोपाऱ्यातील विनोद तावडेच्या रूपाने खोक्यांचे सरकार येणार याचे सुतोवाच तेंव्हाच मिळाले होते.
ज्यांनी ज्यांनी ( अंतःकरणाला खोटे न बोलता सत्य परिस्थितीनुसार ) या नोटाला,नोटांच्या बंडलाला स्वीकारून, अमिषाला बळी पडून EVM चे बटण दाबले.
ते बटण नसून आमचा स्वतःचा तो गळा होता……
एकतर हे बटण व्यवस्थेने आमच्या मतांचा अधिकार हिरावून घेण्यासाठीच निर्मिले.परंतू ,आम्ही यावर आम्ही बहिष्कार टाकला नाही.म्हणजे थोडक्यात आम्हाला आमच्या मताच्या अधिकाराची किंमत केवळ 500 /- चीच वाटली ( जी आमच्या प्राणापेक्षाही मोलाची होती ).
म्हणूनच आमची विधानसभा आज जी आहे,जशी आहे, त्याचे शिल्पकार येथील प्रत्येक महाराष्ट्रीयन जबाबदार आहे.!!
कारण आम्ही विचार करत नाही.जर केलाच तर तो इतरांसमोर व्यक्त होत नाही. म्हणून काहीही होत नाही
जसे…….
मराहुवा इन्सान ना ही कुछ सोचता,ना ही कुछ बोलता..असा हा महाराष्ट्र!
असा प्रश्न पडतो की……
महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि जगमान्य थोर समाजसुधारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र हाच आहे का?


