संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.नामदेव ढाले यांची निवड..

 

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी)

     जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. नामदेव ढाले यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

       डॉ. नामदेव ढाले सर इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून परिचित आहेत.अमरावती विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये पार पाडलेल्या निवडणुकीमध्ये डॉ. ढाले सर विजयी झाले.

      डॉ. ढाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत सात विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केलेली आहे तर 5 विद्यार्थी हे त्यांच्या मार्गदर्शन घेत आहेत.

        त्यांचे 52 पेक्षा जास्त रिसर्च पेपर पब्लिश झाले असून ते नांदेड व पुणे विद्यापीठाच्या पीएचडी प्रबंध मूल्यमापन समितीचे सदस्य आहेत.

         त्यांच्या या निवडीबद्दल डॉ. प्रवीण रघुवंशी,डॉ.संतोष बनसोड,डॉ.रविंद्र मुंद्रे,डॉ.सुभाष गावंडे,डॉ.नितीन चांगोले,डॉ.संदीप राऊत,डॉ. सुभाष मोरे,डॉ.प्रदीप येवले,डॉ. प्रविण सदार यांनी अभिनंदन केले आहे.