जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकपूर दादापुर येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रम संपन्न.

युवराज डोंगरे 

खल्लार/प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकपुर दादापुर येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. नंदकिशोर कराळे हे होते तर प्रमुख पाहुणे रामेश्वर गडलिंग, राजू ढवळे, पेंटर मोहोड अंजनगाव , सूरज मंडे मुख्याध्यापक आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु.ऋतुजा कराळे हिने केले तर आभार प्रदर्शन कू.अर्चना सरोदे यांनी पार पाडले.

या कार्यक्रमामधे शाळेचे विद्यार्थी नंदनी गडलिंग, अनुष्का गडलिंग, आरुषी गडलिंग, परी कराळे, प्रतीक सोनोने, कींजल ढवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राजू ढवळे यांनी भीमा तुझ्या जन्म दिनी आज जमला हा सारा समाज हे गीत सादर केलं तर सूरज मंडे यांनी बाबासाहेब यांचा संघर्षमय दिनचर्या ला उजाळा दिला. या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.