वाहानगाव येथील शुभाष दोडके या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी.:- युवक काँग्रेस पदाधिकारी.. — वनविभागाच्या ताफ्याने केले शेतमालाचे प्रचंड नुकसान.. — तात्काळ ५ हजार रुपयांची मदत..

     रामदास ठुसे

  विशेष विभागीय प्रतिनिधी

          १४ नोव्हेंबरला वहाणगाव शेत शिवारामध्ये वाघाने एका बैलाची शिकार केली होती.शिकारी वरून दोन वाघांचे म्हणजेच “बजरंग व छोटा मटका” नावाच्या वाघांत भांडण होऊन खूप मोठी झुंज झाली व त्या झुंजीत एका “बजरंग” नावाच्या बलाढ्य वाघाचा मृत्यू झाला होता.

            ही बातमी ऐकताच चिमूर परिसरातील लोकांनी मृत झालेल्या वाघाला बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने मोठी गर्दी केली होती.त्यावेळी वनविभागाच्या वाहनांनी सदर घटनेचा पंचनामा तसेच ईतर कार्यवाही करण्यासाठी ज्या ठिकाणी त्या वाघाची शिकार झाली त्या शेतमालकाच्या शेतातील रब्बी माल तुडवणीने नष्ट झाला.

          लहान असलेल्या रब्बी पिकाची फार मोठी नुकसान झाली असल्याने सदर शेतकरी हा हताश झाले व दुःखी होऊन युवक काँग्रेसला आपली आपबिती फोन द्वारे कळविली.

             शेतकऱ्यांनी नुकसान बाबत माहिती देताच युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी जाऊन शेतकरी नामे श्री.सुभाष दोडके यांची व वहानगाव येथील गावऱ्यांना भेट घेतली व सदर घटनेबाबत सविस्तरपणे माहिती जाणून घेतली.

         ज्या शेतकऱ्यांच्या शेतातंर्गत वाघ झुंज व मृत्यू घटनास्थळी घटना बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांच्या गर्दीने व मुख्य म्हणजे वनविभागाने चौकशी करिता शेतमालाच्या शेतीमध्ये वाहनांच्या ताफा घातल्याने शेतमालाचे नुकसान झाले.

        वनविभाग अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी शेतमालाची कोणतीही तमा न बाळगता आपली वाहने शेतमाला मधून चालवली.यामुळे शेतामध्ये असलेल्या रब्बी हरभऱ्याचे पीक भुईसपाट झाले.शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली.

          शेतकऱ्यांच्या शिकार झालेल्या बैलाची नुकसान भरपाई व त्याचबरोबर त्याचेवर आलेले दुबार पेरणीचे संकट कमी करण्यासाठी वन विभागाने तात्काळ मदत दिली पाहिजे यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने वनविभाग व शेतकऱ्यांच्या बाजूने वाटाघाटी करण्यात आली. 

            तसेच शेतकऱ्याला तात्काळ स्वरूपात काही नुकसान भरपाई देण्यात यावी व सदर शेतमालाच्या नुकसानीची योग्य चौकशी करून परिपूर्ण नुकसान भरपाई शेतकऱ्याला देण्यात यावी अशी मागणी रेटून धरण्यात आली.

             श्री.शुभाष दोडके या शेतकऱ्यास वनविभागाने तात्काळ आर्थिक मदत न केल्यास युवक काँग्रेस चिमूरच्या वतीने,वनविभाग चिमूर येथे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोबतीने आक्रोशात्मक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

              इशारा नंतर वनविभाग चिमूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.किरण धानकुटे यांनी शेतकऱ्याच्या व्यथेची जाणीव लक्षात घेता व युवक काँग्रेसच्या रास्त मागणीला लक्षात घेता तात्काळ स्वरूपात शेतकरी श्री.सुभाष दोडके यांना ५ हजार रुपयांची मदत केली व सदर नुकसानीची योग्य नुकसान भरपाई देण्यात येईल असे विश्वास जनक आश्वासन चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी श्री.किरण धानकुटे यांनी दिले.तद्वतच शेतकऱ्यांची समज घालण्यात आली. 

            युवक काँग्रेस चिमूरच्या पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त दुःखी शेतकऱ्यांला मदत केल्याने संबंधित शेतकऱ्याने व वहानगाव येथील शेतकरी बंधू यांनी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

         यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष प्रशांतभाऊ डवले,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष नागेंद्र चट्टे,विलास मोहीनकर सरचिटणीस,ऋषी घरत,कुणाल रामटेके,राजूभाऊ गेडाम,दिनेश भाऊ वाळके,ऋषी हिंगणकर,राजू कुळमेथे,गौरव दोडके,पवन अंद्रस्कर,मुरलीधर दोडके,गजानन दोडके,आदी पदाधिकारी उपस्थित होते.