आरमोरी येथे “व्हॉइस ऑफ मीडिया” च्या सदस्यांना ‘विमाकार्ड’ वितरण कार्यक्रम संपन्न…

प्रितम जनबंधु

   संपादक

         आज दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोज सोमवारला सकाळी १०:३० वाजता विश्राम गृह सार्वजनिक बांधकाम आरमोरी येथे सर्व सदस्यांना “अपघात विमाकार्ड वितरण” करण्यात आले. 

                 पत्रकाराना बातमी संकलीत करीत असताना आकस्मिक अपघात झाल्यास परीवाराना ‘एक मदतीचा हात’ म्हनुन व्हाइस ऑफ मीडिया संघटनेच्या मार्फतिने सर्व सदस्याचा सुरक्षा कवच विमा काढण्यात आला. व्हॉइस ऑफ मीडिया आरमोरी तालुका शाखेच्या वतीने आयोजित अपघात विमाकार्ड वितरणाचा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. 

                   प्रथमत: कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आ. रामकृष्ण मडावी याचे हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन पूजन करण्यात आले. उद्घाटक मा.आ. आनंदराव गेडाम याचे हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

         मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपापल्या शब्द शैलीत मौलिक मार्गदर्शन केले. पत्रकाराची सद्यस्थितीत असलेली व्यथा कथन करण्यात आली. बातमी संचालित करतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. पत्रकार हा खर्या अर्थाने समाजाचा दुवा आहे. त्यामुळेच पत्रकारांनी एकजूट होऊन आपल्या हक्कासाठी लढा द्यावा असे व्यक्तव्य मान्यवरांनी व्यक्त केले.

             यावेळी अध्यक्ष म्हणून डा. रामकृष्ण मडावी (माजी आमदार) हे होते. तर उदघाटक म्हणून मा.आ.आनंदराव गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणुन संजय टिपाले (राज्य सहकार्यवाह, व्हॉइस ऑफ मीडिया, तथा जिल्हा प्रतिनिधी, लोकमत), मा. नासिर हाशमी (जिल्हा कार्याध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया, गडचिरोली ) मा. व्यंकटेश दुड्डमवार जिल्हा अध्यक्ष (व्हॉइस ऑफ मीडिया गडचिरोली), मा. संदीप मंडलिक (पोलीस निरीक्षक, आरमोरी ), मा. सुमित पाकलवार (विदर्भ कार्याध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया ), मा. शैलेश पोटुवार ( तालुका सरचिटणीस, व्हॉइस ऑफ मीडिया, वडसा ) मा. राजू कुंभारे (सहा. वनपरीक्षेत्र अधिकारी, आरमोरी) मा. विलास ढोरे, ( तालुका अध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया, देसाईगंज) आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

      याप्रसंगी व्हाईस ऑफ मिडीयाचे राज्य सहकार्यवाहक म्हणुन नियुक्त झाल्याबद्दल मा. संजय टिपाले याचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तद्वतच उपस्थीत मान्यवरांच्या शुभ हस्ते व्हाईस ऑफ मीडियाच्या आरमोरी तालुका शाखेच्या प्रतनिधीना विमाकार्ड वितरीत करण्यात आले.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील नंदनवार तालुका अध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया, आरमोरी यांनी केले तर संचालन ऋषी सहारे तालुका संघटक व्हॉईस ऑफ मीडिया आरमोरी, आभार प्रदर्शन भीमराव ढवळे यांनी केले. यावेळी सुरेंद्र बावनकर, सुरेश कांबळे, प्रितम जनबंधू, रुपेश बारापात्रे, रुमदेव सहारे, रोशनी बैस, चुन्नीलाल मोटघरे, अनिल सोमनकर, हरेंद्र मडावी, नरेश ढोरे, टिंकू मोंगरकर, प्रशांत झिमटे, विलास चिलबुले तथा व्हाईस ऑफ मिडीया तालुका आरमोरीचे सभासद उपस्थित होते.