Home Maharashtra नेरी येथील जनता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात झालाय साजरा… ...

नेरी येथील जनता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात झालाय साजरा…  — वर्गातील जुन्या आठवणींच्या उजाळ्याने आणि गुरुजनांसह वर्ग मित्रांच्या भेटीने सर्वांचे मन भारावून गेले …

     अमीत देवानंद कऱ्हाडे 

स्नेहमिलन सोहळा वृत्त संकलनकर्ता.. 

         चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा नेरी येथील जनता विद्यालयात,शैक्षणिक वर्ष 2005 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी प्रथमच एकत्र येऊन स्नेह मिलन सोहळ्याचे (गेट-टुगेदर) आयोजन दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोज रविवारला केले होते.

        या अविस्मरणीय सोहळ्यात जनता विद्यालयातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असलेले माजी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आदरणीय शिक्षक एकत्र आले असल्याने हा स्नेह मिलन सोहळा सर्वांसाठी आनंदमय क्षण आणि भावनिकदृष्ट्या परत एकमेकांच्या भेटीगाठी अंतर्गत वैचारिक देवाणघेवाण घेऊन आला होता.

             या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य येरणे सर होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे सचिव टिकाराम पिसे,माजी प्राचार्या डॉ.साखरकर मॅडम,पर्यवेक्षिका बमनोटे मॅडम,माधव पिसे सर,सु.म.पिसे सर,वर्धलवार सर,हरिभाऊ पंधरे सर,वाघमारे मॅडम,टाकसाळे मॅडम,वासेकर सर,अशोक सहारे आणि अनुप डांगे उपस्थित होते. 

        या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवाकुमार शेंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व वर्गमित्र – मैत्रिणींना एकत्र आणले होते.

       मंगेश फटिंग,अमोल नौकरकर,गणेश जांभुळे,स्वप्नील फटिंग,प्रफुल मत्ते,प्रफुल वाघमारे,अमित कऱ्हाडे,आशिष पिसे,सूरज पंधरे,वैभव खाटिक,संकेत सोनवाने,वृषाली कामडी,संध्या मेश्राम,अर्चना पिसे,डिम्पल सोनुले,पायल निखारे,शितल सहारे,अपर्णा कामडी,प्रियंका नागोसे,यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी या स्नेह मिलन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाकरीता मोलाचे सहकार्य केले. 

            तसेच,स्नेह मिलन सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे आणि प्राचार्य यांचेही विशेष सहकार्य लाभले.

        कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त केला.याचबरोबर तात्कालीन विद्यार्थ्यांनी यशस्वी जिवनक्रमातंर्गत घडामोडींचे वास्तव वर्णन व्यक्त करुन स्नेह मिलन सोहळ्यात सहभागी झालेल्या मित्र-मैत्रीनींना आपलेसे केले.

        स्नेह मिलन शोहळ्याचे सूत्रसंचालन दिपाली पंधरे यांनी केले,तर प्रास्ताविक वैशाली धाडसे यांनी केले.आभार प्रदर्शन संजूषा चांदेकर यांनी केले.

       हा सोहळा माजी विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे आणि शाळेप्रती असलेल्या प्रेमाचे प्रतीक ठरला.सर्व उपस्थितांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांचे भरभरून कौतुक केले…