Home देशविदेश “मुक्तीसंग्राम मराठवाड्याचा जागर संविधानाचा,विशेष कार्यक्रम संभाजीनगर येथे १७ सप्टेंबरला… — कार्यक्रमाचे...

“मुक्तीसंग्राम मराठवाड्याचा जागर संविधानाचा,विशेष कार्यक्रम संभाजीनगर येथे १७ सप्टेंबरला… — कार्यक्रमाचे उद्घाटन होणार ना.संजय शिरसाट यांच्या हस्ते… — मंत्री महोदयांसह,खासदार,आमदार, प्रा.अनंता राऊतसह अनेक अधिकाऱ्याची कार्यक्रमाला राहणार उपस्थिती.. 

दिक्षा कऱ्हाडे

  वृत्त संपादीका..

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे,(महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) द्वारा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने व भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम,”मुक्तीसंग्राम मराठवाड्याचा जागर संविधानाचा” या कार्यक्रमाचे आयोजन १७ सप्टेंबर २०२५,ला संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.

       या कार्यक्रमाचे उद्घाटक समाजिक न्याय मंत्री तथा संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय शिरसाट असणार आहेत.

       तर विशेष अतिथी म्हणून ना.श्री.अतुल सावे मंत्री,इतर मागास बहुजन कल्याण,दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य.हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

       याचबरोबर ना.श्रीमती माधुरी मिसाळ,राज्यमंत्री,नगर विकास,परिवहन,सामाजिक न्याय,वैद्यकीय शिक्षम अल्पसंख्याक विकास औकाफ महाराष्ट्र राज्य,श्री.डॉ.भागवत कराड राज्यसभा सदस्य,श्री.सतीश चव्हाण विधानपरिषद सदस्य,श्री.प्रशांत बंब विधानसभा सदस्य,हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

       तद्वतच प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.विक्रम काळे विधानपरिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद (मंत्री दर्जा),श्री.संदीपान भुमरे लोकसभा सदस्य,छत्रपती संभाजीनगर,श्री.संजय केणेकर विधानपरिषद सदस्य,श्री.प्रदीप जैस्वाल विधानसभा सदस्य,श्री.रमेश बोरनारे विधानसभा सदस्य तथा मुख्य प्रतोद (मंत्री दर्जा),श्री.डॉ.कल्याण काळे लोकसभा सदस्य,जालना,श्री.अब्दुल सत्तार विधानसभा सदस्य,श्रीमती अनुराधा चव्हाण विधानसभा सदस्य,श्रीमती संजना जाधव विधानसभा सदस्य,श्री.विलास भुमरे विधानसभा सदस्य,डॉ.श्री. हर्षदीप कांबळे (भा.प्र.से.) प्रधान सचिव,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,मंत्रालय, मुबंई,श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे (भा.प्र.से.) आयुक्त,समाज कल्याण,महाराष्ट्र राज्य,पुणे,श्री.दिलीप स्वामी (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,छत्रपती संभाजीनगर,श्री.सुनील वारे (भा.रे.ले.से.) महासंचालक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे हे सदर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

         संविधानावर विशेष मार्गदर्शन करणारे व्याख्याता म्हणून प्रा.डॉ.अनंत राऊत (नांदेड),श्रि.रविंद्र जोगदंड ज्येष्ठ विचारवंत,लेखक-साहित्यिक हे असणार आहेत.

        कार्यक्रमाला अनुसरून,”स्वर संविधानाचे,अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.सांस्कृतिक कार्यक्रम सादरकर्ते गायक कुणाल वराळे आणि त्यांचा संच असणार आहे.

       कार्यक्रमाचे दिनांक व वेळ : दि. १७ सप्टेंबर २०२५ । स. ११.०० ते संध्या. ५.३० वाजेपर्यंत…
     कार्यक्रमाचे स्थळ : तापडिया नाट्यमंदिर,निराला बाजार,छ. संभाजीनगर हे आहे.
       कार्यक्रमाचे आयोजक व विनीत : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे अंतर्गत अधिकारी व कर्मचारी आहेत.