ग्रामीण भागात निरा नरसिंहपुर ते बावडा परिसरात 77 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.

 

 

नीरा नरसिंहपुर दिनांक: 16

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार ,

निरा नरसिंहपुर परिसरातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये, तसेच आरोग्य कार्यालया मध्ये व माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या आनेक कला गुनातून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

पिंपरी बुद्रुक, निरा नरसिंहपुर, गिरवी, टनु , ओझरे, गणेशवाडी, सराटी, लुुमेवाडी, लिंबोडी, गोंदी, चव्हाण वस्ती, आडोबा वस्ती, या सर्व गावांमधील विद्यालयामध्ये व ग्रामपंचायत कार्यालय व आरोग्य केंद्रामध्ये

 भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजता प्रत्येक गावातून प्रभात फेरी काढून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देऊन , भारत माता की जय वंदे मातरम अशा सर्वच घोषणा देऊन वाजत गाजत गावातून फेरी काढण्यात आली.

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी विद्यमान सरपंच उपसरपंच आजी-माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी सैनिक आरोग्य अधिकारी, महसूल विभाग अधिकारी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी भाऊसाहेब ग्रामस्थ व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रत्येक गावामध्ये उपस्थितीत राहून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयाच्या प्रांगणात आजिनाथ बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायत प्रांगणात विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा सुभद्राताई महादेव बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

 जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात माजी चेअरमन रामचंद्र लावंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच गिरवी यथे सरपंच पार्वती पांडुरंग डीसले,,

 नरसिंहपुर यथे सरपंच अश्विनी चंद्रकांत सरवदे,, टणु येथे सरपंच वैभवी मोहिते,,

गोंदी यथे आगंद देशमुख ,,

सराटी यथे जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे, बाळासाहेब कोकाटे ,रोहीत जगदाळे सरपंच यासीना तांबोळी,, 

 लुमेवाडी यथे सरपंच पोपट जगताप,,

या सर्वांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर आनेक विविध ठीक ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आनेक मान्यवर 

कार्यकर्ते ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले 

या प्रसंगी गावातील व परिसरातील सर्व नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         स्वातंत्र्य दिना निमित्त प्रत्येक शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सादर करण्यात आलेल्या पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याने. कार्यक्रमास आलेल्या पालकांचे व ग्रामस्थांचे मने जिंकली 

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला आलेले प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ पाहुणे आणि मुख्याध्यापक यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य सेनांनी जे योगदान दिले या विषयी मार्गदर्शन केले .

तसेच हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियान अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये व माध्यमिक विद्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेतील शिक्षकांनी माणले .

 शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.