बहुजन समाज पार्टी विधानसभा आरमोरी तर्फे मौजा आकापुर येथे बहन कु. मायावतीजी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…. — वाढदवसानिमित्त विद्यार्थ्याना नोटबुक तर महिलांना साड्या वितरित करून वाढदिवस साजरा…

अश्विन बोदेले 

जिल्हा प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

             गडचिरोली : बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा , उत्तर प्रदेश च्या माजी मुख्यमंत्री, तसेच लोकसभा , राज्यसभा माजी खासदार बहण कू. मायावतीजी यांचा वाढदिवस “जन कल्याणकारी दिवस ” म्हणून मौजा आकापुर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.  

           याप्रसंगी विद्यार्थ्यांना नोटबुक तर महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

           यावेळी बसपाचे पूर्व प्रदेश सचिव डी. एस.रामटेके सर,पूर्व प्रदेश सचिव रमेश मडावी,बामसेफ संयोजक प्रा.रामराव नन्नावरे सर ,पूर्व जिल्हाध्यक्ष वामन राऊत, पूर्व विधान अध्यक्ष सिध्दार्थ घुटके, आरमोरी तालुकाध्यक्ष राजुभाऊ लिंगायत ई. उपस्थित होते.

         याप्रसंगी बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कू. मायावतिजी यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

           याप्रसंगी परिसरातील बसपा कार्यकर्ते व समर्थक जनता उपस्थित होती.