Home Maharashtra अपर आयुक्त यांचा आदेशाने ग्राम पंचायत लोतवाडा येथिल सरपंच, उपसरपंच, व सदस्य...

अपर आयुक्त यांचा आदेशाने ग्राम पंचायत लोतवाडा येथिल सरपंच, उपसरपंच, व सदस्य अपात्र… — तालुक्यात राजकीय खळबळ… — भिमराव कुऱ्हाडे यांनी अप्पर न्यायलयात केली होती तक्रार…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

        दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथिल सरपंच सौ दुर्गा सुधिर गावंडे, उपसरपंच ओंकार बबन,कात्रे ग्रामपंचायत सदस्य सौ.शुभांगी अतूल भदे यांनी ग्रामपंचायतच्या शासकीय जागेत अतिक्रमण करुन सरकारी रस्त्यावर घराचे पक्के बांधकाम करुन अतिक्रमण केल्याने लोतवाडा येथिल सामाजिक कार्यकर्ते भिमराव विठ्ठलराव कुऱ्हाडे यांनी अपर जिल्हाधिकारी,अमरावती येथे अपिल दाखल केली होती.

            त्या अतिक्रमण धारकाचा अहवाल सचिव ग्रामपंचायत लोतवाडा यांनी मोका पाहणी अहवालानुसार सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले असल्याचा पंचनामा करुन त्यावर पंचाच्या सह्या घेऊन तो अहवाल अपर जिल्हाधिकारी,अमरावती यांच्या न्यायालयात दाखल केला होता.

        मात्र न्याय मिळाला नसल्याने त्या आदेशा विरोधात भिमराव कुऱ्हाडे यांनी अपर आयुक्त अमरावती यांचे न्यायालय अमरावती येथे पुन्हा अपिल दाखल केले.

         यावेळी पुन्हा ग्राम पंचायत सचिवांच्या माध्यमातून तपसणी करीत अर्जदार गैरअर्जदार व पंच समक्ष घराची व जागेची मोजणी केली असता सरपंच,उपसरपंच व सदस्य यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्या बाबतचा अहवाल व जीपीएस फोटो अपर आयुक्त अमरावती यांचे न्यायालयात दाखल केले.

         अपर आयुक्त यांनी संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करुन दि. 10ऑक्टोबर रोजी सौ दुर्गा सुधिर गावंडे (सरपंच ) ओंकार बबन कात्रे ( उपसरपंच ) व सौ शुभांगी अतूल भदे ( सदस्य ) ग्राम पंचायत लोतवाडा यांना पद मुक्त केले.

    अपिलार्थी भिमराव कुऱ्हाडे यांचे वतीने ॲड स्वप्नील पाटील ओव्हर अमरावती यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया.. 

हा सत्याचा विजय..

      लोतवाडा येथिल सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी अतिक्रमण केले होते. त्याबाबतचा पाठपुरावा मी केला न्यायव्यवस्थेने सत्य समोर आणले त्यात शेवटी सत्याचा विजय झाला.

भिमराव कुऱ्हाडे

  अपिलार्थी

        अप्पर आयुक्त अमरावती यांनी दिलेला निर्णय मला पूर्णपणे मान्य आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे.

सौ दुर्गा सुधिर गावंडे 

सरपंच, लोतवाडा