Home Social कॅप्टन सतीश बेलसरे यांच्या शहर विकास मंच द्वारे सत्कार…

कॅप्टन सतीश बेलसरे यांच्या शहर विकास मंच द्वारे सत्कार…

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

कन्हान :- कन्हान शहरात पहिल्यांदाच कन्हान यूथ फाउंडेशन आणि आनंदधाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवकासाठी आणि परिवारासाठी आईये धन्यवाद करे माता – पिता का…! या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शनिवार ला कुलदीप मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.

           अंतरराष्ट्रीय व्याख्याते भाविन जे.शहा यांनी आपल्या व्याख्यानातुन आई वडिलांबाबत योग्य मार्गदर्शन करुन उपस्थित युवकांना,पालकांना अलिंगण घालुन अश्रुच्या धारांनी भावनात्मक भावविभुर करुन आई वडिलांचे अतुट नाते असल्याचे प्रगटन केले.

         शहरात पहिल्यांदा झालेल्या या कार्यक्रमाची सर्वत्र कौतुक होत आहे . कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी या समाजिक उपक्रमाचे नियोजन केल्याबद्दल रविवार ला संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये कॅप्टन सतीश बेलसरे यांच्या निवास्थानी जाऊन शाॅल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन अभिनंदन केले.

          या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, माजी मुख्याध्यापिका विशाखा ठमके , लोकेश दमाहे , अभिषेक साखरे , मुकुल शिवरकर , निखिल मेश्राम , साहिल सैय्यद , शुभम बावनकर , आयुष संतापे , अभय ऊके , रुजल मेश्राम सह आदि सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.