जे तिकडे गेले त्यांनी आता निवडून येऊन दाखवावे.:-जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे… — आळंदीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्ता बैठकीचे आयोजन…

 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक 

पुणे विभागीय 

        आळंदी : आमच्या सोबत या नाही तर तुरुंगात जा..  या भितीनेच ते भाजप सोबत गेले आहे, जे तिकडे गेले त्यांनी आता निवडून येऊन दाखवावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्यांना मोठे केले, तेच पक्ष सोडून गेले. परंतु कार्यकर्ते साहेबांसोबत आहेत. तेच पक्षाला बळकटी देण्याचे कार्य करतील, असा विश्वास माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी आळंदी येथे बोलताना व्यक्त केला.

          आळंदी येथे ज्ञानदर्शन सभागृहात माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आळंदी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

          यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, विलास कुऱ्हाडे, राहुल चिताळकर पाटील, माजी नगरसेवक विलास घुंडरे, वासुदेव घुंडरे, श्रीधर कुऱ्हाडे, मालनताई घुंडरे, राधाबाई घुंडरे, उषाताई नरके, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, सुनील रानवडे, पुष्पा कुऱ्हाडे, लता मिंढे, संचालक बाबुलाल घुंडरे, शाम कोलन, संजय वडगावकर, बाळासाहेब डफळ, माऊली वहीले, प्रमोद कुऱ्हाडे, संचालक ज्ञानेश्वर घुंडरे, समीर कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर गुळुंजकर, रमेश गव्हाणे, आरिफ शेख, विष्णू घुंडरे, मयुर कुऱ्हाडे, भाऊसाहेब कोळेकर, संकेत कुऱ्हाडे, उमेश रानवडे, सोमनाथ कुऱ्हाडे, बाळकृष्ण आरु, रवींद्र कुऱ्हाडे, नंदकुमार गोडसे, सागर कुऱ्हाडे, कृष्णा थोरवे, सतीषबापू कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सिद्धेश कुऱ्हाडे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

            आळंदी परिसरातून कबीरबुवा आणि ताराचंद वडगावकर यांच्या सारखे आमदार खेड तालुक्याला लाभले पण त्यानंतर आळंदीला कायमच आमदारकी पासून वंचितच राहावे लागले आहे तरी येणाऱ्या निवडणुकीत आळंदी शहराचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे यांनी केली.