डॉ.सतिश वारजूकरांना जनसेवेची उत्तम व नामी संधी… — त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वास्तव्य व सत्य… — अन.. विजयभाऊ….? — उद्याचा कार्यकर्ता मेळावा…प्रसंग कांग्रेस पदाधिकारी अनुभवाचा… — “दखल न्यूज भारत विशेष,…

 

              चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.सतिश मनोहरराव वारजूकर यांना मी अगदी जवळून बघितले व अनुभवले आहे.याच बरोबर चिमूर तालुकातंर्गत कांग्रेस पक्षातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्तांसी मैत्रीपूर्ण संवादांचा व संबंधांचा अनुभवही बराच आहे.

            त्यांचे वडील डॉ. मनोहरराव वारजूकर यांना मी कधीकाळी दिसलो की ते मला प्रेमाणे शब्दशः जवळ बोलवत होते व आस्थेने विचारपूस करीत पाठीवर हात ठेवत होते.अतिशय आंत्तर मनातून भावना व्यक्त करण्याची त्यांची मनमोकळीकता तत्वता मनाला शांत करून जायची. 

        याचबरोबर माजी आमदार व माजी खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष डॉक्टर अविनाश वारजूकर यांचा सभाव वाटायला तसा गुर्मीतला कळक.पण तेही महू व कोमल आहेत.

           मी नेहरू विद्यालय शंकरपूर येथे पुर्व माध्यमिक शाळेत शिकल्याने शंकरपूरकरांच्या भावनांची व सदभावनांची माहिती आहे.

**

मुळ मुद्दा‌…

 राष्ट्रिय कांग्रेस पक्ष व त्यांची जबाबदारी…

         राजकारण,समाजकारण,हे देशाच्या प्रगतीची अर्थात देशातील नागरिकांच्या प्रगतीची निव आहेत.ही निव राष्ट्रीय कांग्रेस पक्षाला कर्तव्यदक्षतेतून सहज जमली आहे.

             जुना पक्ष व अनुभवी पदाधिकारी आणि अनुभवी कार्यकर्ता अशी या पक्षाची जगात ओळख आहे.तद्वतच या पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता नेहमी बोलतांना खबरदारी घेतोय आणि बोलण्यातून कुणाचाही अपमान होणार नाही असी मानसिकता सातत्याने उजागर करतो.

              परत्वे हा पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काळजी घेतो व प्रसंगानुरूप आवश्यक मदतही करतो.

            पदाधिकारी व कार्यकर्ता हे समाजिक आणि राजकीय शक्तीचा आधार असतात याची जाणीव राष्ट्रीय काँग्रेस पक्षांच्या प्रमुखास संवेदनशिलपणे असते.म्हणूनच या पक्षाचे प्रमुख शालिंतेने,समजदारीने व विनंम्रपणे नेहमी वक्तव्य करतात असे दिसून येते आणि असे कर्तव्ये देश व देशातील नागरिकांच्या उत्तम हितासाठी असतात हे स्पष्ट असते.

       “श्रध्दा ते प्रगल्भता…

         प्रगल्भता ते समजदारी..

       समजदारी ते अनुभव…

          अनुभव ते कर्तव्य…

        कर्तव्य ते देशहित..

            देशहित ते जनहित..

        जनहित ते विज्ञान…

  विज्ञान ते विचार परिपक्वता..

 विचार परिपक्वता ते एकसंघता..

     एकसंघता ते सामाजिक बांधिलकी…

   सामाजिक बांधिलकी ते सामाजिक उन्नती…

     सामाजिक उन्नती ते सामाजिक समरसता….

    समाजिक समरसता ते समानता…

       समानता ते बंधुभाव…

  बंधुभाव ते समान न्याय..

  समान न्याय ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक…

    अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक ते स्वातंत्र्य मुल्याचे जतन…

   स्वातंत्र्य मुल्याचे जतन ते नागरिकांच्या सर्व अधिकार हक्काचे रक्षण…

     नागरिकांच्या अधिकार हक्काचे रक्षण ते शक्तीशाली देश..

     शक्तीशाली देश ते समृध्द नागरिक…

      आणि समृध्द नागरिक ते सक्षम समाजिक बांधिलकी…

         असे नेतृत्व गुण राष्ट्रीय कांग्रेस पक्षात आहेत..

              यामुळे वारंवार पक्ष फुटी नंतरही या पक्षाचे लचके कुणालाच करता येत नाही..आणि पुढे चालूनही करता येणार नाही..

 *****

   डॉ‌.सतीश वारजूकर..

             डॉ‌‌.सतीश वारजूकर यांना अनेक कर्तव्याची परिभाषा अवगत आहे‌ आणि त्यांच्या कर्तव्याची परिभाषा मी बऱ्याच पैकी जाणतो आहे.

           पण,त्यांच्या बाबतीत महत्वपूर्ण असे की राजकारणात दिर्घकाळ टिकून राहण्यासंबंधाने ओढ,क्षमता,वैचारिक परिपक्वता,धैर्यशिलता व ध्येयपुर्तता हे त्यांच्यातील दायित्व गुण पक्ष निष्ठतेच्या बांधिलकी बाबत वारंवार चैतन्य निर्माण करतात आणि अनेक कांग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रेरणा देतात.

          निष्ठेची जोड असल्याशिवाय पक्षात टिकता येत नाही आणी उत्तम कार्ये व कर्तव्ये पार पाडता येत नाही.याच बरोबर पक्ष म्हटले की बऱ्याच प्रसंगानुसार अपमान सहन करावा लागतो व मान सुध्दा स्विकारावा हे त्यांनी स्वतः अनुभवले आहे.

        मात्र,चांगले तेवढे घेणे,मनात ठेवणे आणी वाईट तेवढे बाहेर फेकणे यालाच म्हणतात उत्तम गुण..आणि हे उत्तम गुण डॉ.सतिश वारजूकर यांच्यात आहेत.

              यामुळे चिमूर विधानसभा मतदार संघात त्यांच्या एवढा मुरब्बी व जनतेच्या हितासाठी पोटतिडकीने धडपणारा इमानदार असा दुसरा नेता नाही‌.

                पदाधिकारी व कार्यकर्त्यांसी सुसंवाद करणे,तद्वतच सामाजिक बांधिलकी कायम राखणे याबाबत त्यांच्यातील सखोलता गहण असल्याने त्यांचे नेतृत्व उजाळून निघणारे आहे व निघणार आहे.

               आजच्या स्थितीत राजकारणाचे स्थितांतरे बघितले तर डॉ.सतिश वारजूकरांना लोकसेवक म्हणून उत्तम सेवा करण्याची नामी संधी परत मिळणार आहे. 

            फक्त त्यांचा स्वयं,त्यांची ओळख ही पुढे चालून बरीक व अति संवेदनशील असायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्याप्रती मी तरी ठेवू इच्छितो…

***

ना‌.विजयभाऊ….

         राजकीय व सामाजिक डावपेचात सातत्याने जिंकणारे व समाजिक आणि राजकीय परिस्थितीबाबत नेहमी जागरुक,सतर्क असणारे बोलके नेतृत्व व व्यक्तीत्व म्हणजे महाराष्ट्र राज्य विधानसभाचे विरोधी पक्ष नेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार होय…

             तळागाळातील सर्व समाजिक नागरिकांची व कार्यकर्त्यांची त्यांना आत्मियता अंतर्गत असलेली जाणिव त्यांच्या कार्याचा कणा आहे.

             त्यांच्या अनेक कार्यकर्तांनी त्यांचा हिरमोड केला असेल किंवा त्यांचा अनेक कार्यकर्त्यांप्रती हिरमोड झाला असेल,पण त्यांनी दुराभाव व द्वेषभाव बाजूला सारुन सर्व कार्यकर्त्याप्रती सदैव तत्परता दाखविली आहे आणि कुणाचीही आंत्तरिक व सार्वजनिक बदनामी करणारा अपप्रचार केला नाही,हा त्यांचा कार्यप्रकार त्यांच्या कर्तव्याच्या हातोटी संबंधाने राजकीय व सामाजिक पटलावरील बरेच गुणधर्म सांगून जातय.

        ना.विजयभाऊ वडेट्टीवार हे नेहमी धडपडणारे व धडधडणारे नेतृत्व असल्याने त्यांच्या नेतृत्व गुणाची झलक परत चिमूर विधानसभा मतदार संघात अनुभवास येणार आहे.

  ***     

          उद्याचा मेळावा..‌

                डॉ.सतिश वारजूकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्याला कांग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा चिमूर येथे आयोजित केला आहे.सदर मेळावा कांग्रेसचे जेष्ठ नेते माधवराव बिरजे यांच्या मालकीहक्काच्या भव्य पटांगणावर होणार आहे.

           प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार,माजी आमदार व माजी खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष डॉक्टर अविनाश वारजूकर यांच्यासह अनेक कांग्रेस पक्ष पदाधिकारी या कार्यकर्ता मेळाव्यास अतिथी म्हणून लाभणार आहेत.

         हा कार्यकर्ता मेळावा अपेक्षा पेक्षा अधिक यशस्वी होणार आहे,याबाबत खात्री आहे. 

****

           माजी प‌.स.सदस्य विजय गावंडे हे अतिशय सुसंस्कृत व मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आहेत.त्यांच्या नेतृत्वात चिमूर तालुकातंर्गत कांग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे‌ यात शंका नाही. 

            याचबरोबर ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य सचिव धनराज मुंगले,जेष्ठ नेते धनराज मालके,सुधीर पंदीलवार,राजू लोणारे,माजी जि.प.सदस्य विलास डांगे,गजानन बुटके,माजी प.स.सभापती रोशन ढोक,स्वप्नील मालके,जेष्ठ नेते प्रा.राम राऊत,मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे,आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्तागण पक्षहितासाठी व जनहितार्थ निर्भयपणे व बिनधास्त कार्य करण्यासाठी पुढे येतील यात शंका नाही.

****

   अग्रलेखक

  प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

दखल न्यूज भारत व विदर्भ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई…

***

(टिप :- एखाद्या नेत्याची रुपये घेऊन वाहावाह करतात अशा प्रकारे बेसुट आरोप बरेचजण करतात.पण,मि कुणाच्याही दबावात पत्रकारिता करित नाही व रुपये घेऊन कुणाचाही उदोउदो करित नाही.

         वरील अग्रलेखात लिहिले आहे ते प्रत्यक्ष अनुभवाचे कथन आहे.तद्वतच ना.विजयभाऊ वडेट्टीवार व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.सतिश वारजूकर यांच्या सोबत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संवाद आणि भेट बऱ्याच दिवसापासून नाही.)