Home देशविदेश विहिरगाव जि.प.उच्च प्राथमिक शाळेत स्वतंत्र्य दिन उत्साहात साजरा..‌ — संत ज्ञानेश्वर...

विहिरगाव जि.प.उच्च प्राथमिक शाळेत स्वतंत्र्य दिन उत्साहात साजरा..‌ — संत ज्ञानेश्वर महाराज यांची काढण्यात आली पालखी..

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी…

       स्वातंत्र्य दिनानिमित्त विहीरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत स्वतंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला व सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज फडकवला गेला.

          याचबरोबर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार मौजा विहीरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पाच वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काढण्यात आली.

        या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य,विद्यार्थी, विद्यार्थीनी,शिक्षक वृंद तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

            यात जि.प.उच्च प्राथमिक शाळा विहीरगांव येथील मुख्याध्यापक आनंदराव कामठी,जि.प.शाळेचे शिक्षक बुद्धपाल कऱ्हाडे,जि.प.शाळेचे शिक्षिका यामिना नन्नावरे,विहीरगांव ग्रामपंचायत सरपंच सितल मुंडरे,किसन दांडेकर,उत्तम मेश्राम,रेखा नागोसे,मनिषा राणे, सामाजिक कार्यकर्ते दौलत मोहीनकर,विहीरगांव पोलीस पाटील दुर्गेश्वर चन्ने,आदींचा समावेश होता.