Home Crime कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत अनागोंदी व मनमानी कारभार.. — काम न करताच...

कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत अनागोंदी व मनमानी कारभार.. — काम न करताच लाखो रुपये काढून केले परस्पर खर्च.. — सरपंच व ग्रामसेवकाची सखोल चौकशी व्हावी.. — भाग १…

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

          ग्रामपंचायत अंतर्गत आर्थिक व्यवहार हा नियमानुसार नियोजनबद्धतेत होत नसेल तर सरपंच व ग्रामसेवकांची पंचाईत कराणारा कारभार ठरतो हे उघड आहे.

          महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये सुद्धा विविध अंगांनी राजकीय हस्तक्षेप वाढू लागला असल्याने ग्रामपंचायतींच्या अनेक कामातंर्गत भ्रष्टाचारी लोक भ्रष्टाचार करून मोकळे होतांना दिसतात.

            “ना जनाची,ना मनाची,अशी स्थिती राजकीय हस्तक्षेपातंर्गत अनेक नेत्यांची,अधिकाऱ्यांची,कंत्राटदारांची,व सरपंच-सचिवांची झाली आहे.

         मात्र,चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव ग्रामपंचायतचा आर्थिक कारभार तर काही औरच आहे.या ग्रामपंचायत अंतर्गत तर,”ना काम आणि पैसा आण,अशी कार्यपद्धत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.

      म्हणजेच कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत काम न करता लाखो रुपये काढून परस्पर खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

          पंधरा वित्त आयोगाच्या रुपयांच्या माध्यमातून ६० टक्के निधीला अनुसरून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करणारे कामे करणे बंधनकारक आहे.

      तद्वतच गावातील नाली बांधकाम करणे आणि गावातील स्वच्छता राखणे यावर खर्च करणे अनिवार्य आहे.

            याचबरोबर ४० टक्के निधीला अनुसरून प्रासंगिक कामात लोकहितार्थ बदल करणे आणि ४० टक्के निधीला अनुसरून ३० टक्के निधी अन्वये इतर आवश्यक लोक गरजे नुसार नियोजन करणे,अपंगत्व व्यक्तींना मदत करणे अशाप्रकारे खर्चाचे नियोजन असणे आवश्यक आहे.तद्वतच १० टक्के निधी अंतर्गत शाळेला,अंगणवाडीला आवश्यक असणारे साहित्य खरेदी करून देणे,शालेय विद्यार्थ्यांना कपडे,बॅग,बुट,पुस्तके घेऊन देणे,शाळा आणि अंगणवाडींची रंगरंगोटी करणे यावर खर्च मर्यादा आहेत.

         मात्र,कोटगाव ग्रामपंचायत मध्ये,ग्रामपंचायत बाह्य व्यक्ती,(ग्रामपंचायत सदस्य नसलेला) आर्थिक व्यवहारामध्ये लुडबुड करीत असून सदर व्यक्ती प्रत्येक कामात व आर्थिक व्यवहारात दैनंदिन हस्तक्षेप करीत असल्याची माहिती आहे.

        याच व्यक्तींनी ग्रामसेवकाची दांडी उडवीत चिमूर तालुक्यातील एका राजकीय व्यक्तीला(माजी प.स.उपसभापतीला) हाताशी धरले व २०२३ च्या माहे ऑक्टोबर महिन्यात एकाच दिवशी,सहा वेळा ६ लाख ८९ हजार रुपये त्याच राजकीय व्यक्तीच्या बॅक खात्यावर नियमबाह्य वळते केले असल्याचे पुरावे सांगून जातात.

           कोटगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री.दलांजे तर बादशहा व्यक्ती असल्याचे त्यांच्या कार्यपद्धतीवरुन दिसून येते.ग्रामसेवक श्री.दलांजे पत्रकारांना माहिती न देण्यासाठी आपला फोन बंद करून ठेवतात,आणि फोन सुरु असला तर काॅल स्विकारत नाहीत..

        सदर ग्रामसेवकांना वाटत असेल की पत्रकारांना माहिती दिली नाही तर बला टळतय.पण,आजच्या आँनलाईन माहितीच्या,माहितीच्या व डिजिटल माहितीच्या युगात गैर व्यवहाराची बला टळेल तरी कशी?

       काम न करता काढलेले लाखो रुपये त्यांची खाजगी मालमत्ता असल्याची त्यांनी समज केली व काढलेले रुपये परस्पर खर्च करून मोकळे झाल्याची धक्कादायक बाबही पुढे आली.

          काम न करता काढलेले लाखो रुपये कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांच्या टाळू वरील लोणी खाल्ल्या सारखे नाही काय? आणि शासन-प्रशासना सोबत गैरमार्गाने केलेली धोखाधाडी नाही काय?

      सदर व्यक्ती ग्रामपंचायत पदाधिकारी नसतांना त्याच्यावर विश्वास दाखवून डिजिटल सहीनिशी पंधरा वित्त आयोगाचे लाखो रुपये काढण्याचा बॅक व्यवहार ग्रामसेवक दलांजे यांनी केलाच कसा?

   (पुढील भागात सविस्तर)