अवैध रेती चोरीचे ३ ट्रक पकडले.. — कन्हान पोलीसांची धडक कारवाई.. — ७ आरोपींवर गुन्हा दाखल… — मोबाईल,३ ट्रकसह १९ ब्रास रेती जप्त..

 

कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा टोल नाक्या जवळ कन्हान पोलीसाना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर नाकाबंदी करून विना परवाना अवैधरित्या चोरीची रेती वाहतुक करताना तीन ट्रकसह १९ ब्रॉस रेती व ५ मोबाईल असा एकुण ७५ लाख ८८ हजार रूपयांचा मुद्दे माल जप्त केला व ७ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीसांनी पुढील तपास सुरु केलाय. 

         पोलीस स्टेशन कन्हानचे स.फौ. सदाशिव काठे हे (दि.१२) ऑक्टोंबरचे रात्री ९ वा. पासुन ते (दि.१३) ऑक्टोंबर २०२३ चे सकाळी १० वाजता पर्यंत रात्र पाळी अधिकारी म्हणुन कर्तव्यावर होते.

        रात्रो ९.२३ वाजता पो.स्टे परिसरात सोबत पोना महेंद्र जळीतकर,पोशि वैभव बोरपल्ले,पोशि सम्राट यांचे सह पेट्रोलींग करित असतांना गुप्त माहिती मिळाली की,मनसर कडुन नागपुर कडे अवैधरित्या रेती भरून ३ ट्रक येत आहेत.या माहितीच्या आधारावर बोरडा टोल नाका कन्हान येथे पंच व स्टॉफ सह नाकाबंदी केली असता ट्रक मनसर कडुन टोल नाक्याकडे येतांना दिसले.

            टोल नाका पार केल्यानंतर लगेच पोलीसानी पंचासह तिन्ही ट्रक चालकांना हात देवुन ट्रक थांबवीले व ट्रकची पहाणी केली असता ट्रकमध्ये रेती असल्याची खात्री झाल्याने सदर तिन्ही ट्रक १) अशोक लेलॅन्ड कंपनीचा १० चाकी ट्रक क्र.एमएच- ४९- एटी-९१६८ किमत २५ लाख रूपये व ६ ब्रॉस रेती किमत २००० रू. प्रति ब्रॉस प्रमाणे १२००० रूपये, २) अशोक लेलॅन्ड कंपनीचा १२ चाकी चाकी ट्रक क्र.एमएच – ४९ – बीझेड – ९१६८ किमत २५ लाख व ७ ब्रॉस रेती किमत१४००० रूपये, ३) अशोक लेलॅन्ड कंपनीचा १० चाकी ट्रक क्र. एमएच – ३४- बीजी- ०९२७ किमत २५ लाख व ६ ब्रॉस रेती किमत १२००० रूपये, यातील चालक व कंडक्टर चे ५ मोबाईल असा एकुण ७५ लाख ८८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला व कन्हान पोस्टेला सरकार तर्फे फिर्यादी सफौ.सदाशिव काठे पो.स्टे. कन्हान यांचे तक्रारीवरून आरोपी १) अब्दुल मतीन वल्द अब्दुल हक्क वय ४७ वर्ष रा. अब्दुल हक्क वार्ड नं ३ बिना संगम ता. कामठी, २) सुरेश हरिचंद गंथाळे वय ५३ वर्ष रा. शास्त्री नगर नागपुर, ३) रामप्रसाद मनसा राम मारबते वय ३८ वर्ष रा. शिकारपुर ता. कुही, ४) गुड्डु उर्फ विक्की मोरेश्वर हिवरकर वय २६ वर्ष पचखे डी ता. कुही, ५) मंगेश रवी पवारे वय २२ वर्ष राह. निलज ता. पवनी जि. भंडारा, ६) शेख बशीर शेख हुसैन वय ५४ वर्ष रा. बिना संगम ता. कामठी, ७) ट्रक मालक अक्षय घात राह. दिघोरी नागपुर या नमुद आरोपींनी ट्रक भरून शासनाचे महसुल बुडविण्याचे उद्देशाने रेती चोरून वाहतुक करतांना मिळून आल्याने त्यांचे विरूध्द कलम ३७९, १०९, ३४ भादंवि, सह कलम ४८ (७), (८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनिय म १९६६ अन्वये गुन्हा नोंद केला.

         सदर कार्यवाही कन्हान पोलीस स्टेशनचे वरिष्ट पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचे मार्गदर्शनात सफौ.सदाशिव कोठे, महेंद्र जळितकर,वैभव बोरपल्ले,सम्राट वनपती सह अन्य पोलीस कर्मचा-यांनी यशस्वीरित्या पार पाडली.