भाजपा व अनुसूचित जाती मोर्चा तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात साजरा..

 

कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 

कन्हान : – भारतीय जनता पार्टी कन्हान शहर आणि भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कन्हान तर्फे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे व सुजाता बौद्ध विहार नाका नंबर ७ आंबेडकर नगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

            कार्यक्रमाचे आयोजन संजय रंगारी अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा यांनी केले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा,नागपूर जिल्हा महामंत्री चवरे हे उपस्थितीत होते.

        कार्यक्रमाचे संचालन सुनिल लाडेकर यांनी तर आभार सचिन वासनिक याने केले. 

          धम्मचक्र परिवर्तन कार्यक्रमा प्रसंगी प्रामुख्याने रिंकेश चवरे,राजेंद्र शेंदरे गट नेते,सुनिल लाडेकर,कामेश्वर शर्मा,संजय रंगारी,संगीता खोब्रागडे नगरसेविका,अनिता पाटील,शैलेश शेळके,गुरुदेव चकोले,सचिन वासनिक,अमोल साकोरे,उपासराव खोब्रागडे,चंद्रगुप्त नतावने,सुषमा मस्के,प्रतिक्षा चवरे सर्व आघाड्यांचे पदाधिकारी,नगरसेवक,नगरसेविका,महिला आघाड़ी,युवा मोर्चा,ओबीसी मोर्चा,अनुसुचित जाती मोर्चा,व्यापारी आघाडी,बुथ अध्यक्ष,उत्तर भारतीय आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.