प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
शपथेमध्ये,व्यक्ती आपल्या शब्दांची सत्यता आणि वचनाचे पालन करण्याचे गांभीर्य सिद्ध करण्यासाठी भारतीय संविधानाची,देवाची किंवा एखाद्या पवित्र वस्तूची मदत घेते आणि असे म्हणते की तो संविधानाशी निष्ठा राखेल आणि भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखणे यासारखे आपल्या पदाला अनुसरून काम निष्ठेने पार पाडेल.
ही एक गंभीर प्रतिज्ञा आहे जी महत्त्वाच्या कर्तव्याप्रती भारत देशात,”केंद्र सरकार स्थापनेतंर्गत महामहीम राष्ट्रपतींकडून प्रधानमंत्री,मंत्री,स्वतंत्र प्रभार मंत्री,राज्यमंत्री हे पद व गोपनीयतेची शपथ घेतात आणि भारत देशांतर्गत सर्व राज्याचे मुख्यमंत्री,मंत्री,राज्यमंत्री हे महामहीम राज्यपाल यांचे,द्वारे पद व गोपनीयतेची घेतात.
याचबरोबर सत्ता स्थापनेनंतर लोकसभा व राज्यसभा पिठासीन अध्यक्ष लोकसभा सदस्य (खासदार) व राज्यसभा सदस्य (खासदार) यांना व विधानसभा विठासीन अध्यक्ष व विधानपरिषद पिठासीन अध्यक्ष विधानसभा सदस्य (आमदार) व विधानपरिषद सदस्य (आमदार) यांना भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून वरील प्रमाणे सपथ देतात..
परंतु सत्ता स्थापन झाल्यानंतर शपथेच्या मुख्य उद्देशाला व शपथेप्रमाणे सत्य आणि निष्ठेच्या हमीला प्रधानमंत्री,मंत्री,स्वतंत्र प्रभार मंत्री,राज्यमंत्री,मुख्यमंत्री,मंत्री,राज्यमंत्री मानत नसल्याचे गंभीर वास्तव अनेकदा पुढे आले आहे.(काही वगळता)
मात्र,शपथा घेणारी व्यक्ती प्रमाणित करते की तो जे काही बोलत आहे ते खरे आहे आणि तो त्याचे वचन प्रामाणिकपणे पाळेल.
देवाचा किंवा इतर कोणत्याही पवित्र गोष्टीचा उल्लेख करून,शपथेला एक गंभीर आणि पवित्र बंधनाचा दर्जा मिळतो,ज्यामुळे तो मोडण्याचा धोका कमी होतो.
तद्वतच भारतीय संविधानाने पदभार स्वीकारणाऱ्या व्यक्तींसाठी वेगवेगळे शपथेचे स्वरूप दिले आहे.
संविधानाशी निष्ठा राखण्यासाठी आणि भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्यासाठी शपथा घेतली जाते.व्यक्ती शपथ घेते की तो त्याच्या पदाशी जोडलेली कर्तव्ये निष्ठेने पार पाडेल.
उदा :- आमदारांची शपथ..
“मी कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधानावर खरा विश्वास आणि निष्ठा ठेवेन,मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखेन आणि मी जी कर्तव्ये स्वीकारणार आहे ती मी निष्ठेने पार पाडेन”.
राष्ट्रपतींची शपथ…
राष्ट्रपती त्यांच्या शपथेत देशाचे संविधान आणि कायदे जपण्याचे,त्यांचे संरक्षण करण्याचे आणि त्यांचे रक्षण करण्याचे आणि भारतीय लोकांच्या सेवेसाठी आणि कल्याणासाठी स्वतःला समर्पित करण्याचे वचन देतात.
अनुच्छेद ६० नुसार राष्ट्रपतींनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे – भारतीय संविधान…
अनुवादित — मी देवाच्या नावाने शपथ घेतो की मी भारताच्या राष्ट्रपतीचे पद निष्ठेने पार पाडेन (किंवा राष्ट्रपतीची कार्ये पार पाडेन) आणि माझ्या क्षमतेनुसार संविधान आणि कायद्यांचे जतन,संरक्षण आणि रक्षण करेन.
शपथ किंवा प्रतिज्ञापत्राचे प्रकार…
– भारताचे संविधान…
अनुवादित —, मी विधानसभेचा (किंवा विधान परिषदेचा) सदस्य म्हणून निवडून (किंवा नामनिर्देशित) झालो आहे,मी देवाला/भारतीय संविधानाला साक्ष ठेवून गंभीरपणे प्रतिज्ञापत्र करतो की मी कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधानावर खरा विश्वास आणि निष्ठा ठेवेन आणि मी ते कर्तव्य पार पाडेन…
शपथ ही एखाद्या वस्तुस्थितीची किंवा वचनाची अभिव्यक्ती असते ज्याची सत्यता त्यात पवित्र गोष्टीचा उल्लेख करून निश्चित केली जाते.
शपथपत्राची व्याख्या आणि अर्थ अनुवादित — अनेकवचनी … सत्य बोलण्याचा,वचन पाळण्याचा दृढनिश्चय सिद्ध करण्यासाठी देवता किंवा पूजनीय व्यक्ती किंवा वस्तूला गंभीर आवाहन. शपथपत्रावर साक्ष देणे.अशा आवाहनामुळे बळकट झालेले कोणतेही विधान किंवा वचन. … आणि…शपथपत्र किंवा प्रतिज्ञापत्राचे स्वरूप – भारतीय संविधानाचा अनुच्छेद १७३अ.
विधानसभा किंवा विधान परिषदेतील एका जागेसाठी उमेदवार म्हणून नामांकित होत असताना,मी देवाच्या नावाने शपथ घेतो / गांभीर्याने प्रतिज्ञा करतो की मी कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधानावर खरा विश्वास आणि निष्ठा ठेवीन आणि मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखीन आणि मी जी कर्तव्ये स्वीकारणार आहे ती मी विश्वासूपणे पार पाडीन.
अनुवादित — मी, (नाव), देवाच्या नावाने शपथ घेतो (किंवा गांभीर्याने प्रतिज्ञा करतो) की मी कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधानावर खरा विश्वास आणि निष्ठा ठेवीन,की मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखीन,की मी भारताचा पंतप्रधान किंवा मंत्री असेन…
शपथेचा अर्थ एखाद्या व्यक्तीने जे म्हटले आहे त्याचे सत्य साक्षीदार होण्यासाठी किंवा तो जे म्हणतो ते करण्याचा त्याचा प्रामाणिक हेतू आहे याची साक्ष देण्यासाठी देवाला किंवा प्रभूला एक गंभीर औपचारिक आवाहन प्रधानमंत्री,केंद्रीय मंत्री, केंद्रीय स्वतंत्र प्रभार मंत्री,केंद्रीय राज्यमंत्री,मुख्यमंत्री,कॅबिनेट मंत्री,राज्यमंत्री करतात.
मात्र,भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून पद व गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर शपथेप्रमाणे जर प्रधानमंत्री,केंद्रीय मंत्री,केंद्रीय स्वतंत्र प्रभार मंत्री,केंद्रीय राज्यमंत्री,मुख्यमंत्री,कॅबिनेट मंत्री,राज्यमंत्री,खासदार,आमदार हे योग्य कृती व योग्य वर्तणूक करीत नसतील तर त्यांना काय म्हणावे? हा खरा प्रश्न भारतीय नागरिकांना पडला आहे आणि त्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यावा,हा मुद्दाच भारतीय नागरिकांपुढे गंभीर प्रकारचा असा आवाहानात्मक बनत चालला आहे…
केंद्र सत्ताधारी व राज्य सत्ताधारी हे देशातील नागरिकांची धर्मनिरपेक्षता,समता,न्याय,बंधुत्वता,स्वातंत्र्य,अभिव्यक्तीत्व आणि हक्क धोक्यात आणत असतील आणि भारतच्या अखंडतेला व सार्वभौमत्वला,धोका निर्माण करीत असतील तर अशा सत्ताधाऱ्यांना देशद्रोही व समाजद्रोही या आरोपातंर्गत महामहीम राष्ट्रपती आणि महामहीम राज्यपाल यांनी वेळीच सत्ताच्यूत केले पाहिजे आणि त्यांच्यावर आरोप निश्चित केले पाहिजे.
याचबरोबर त्यांच्यावर सामान्य नागरिकांप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे,या मताची भारतीय जनता आहे.



