संविधान म्हणजे भारतीय राज्यघटना.परंतु केवळ राज्य कसे चालवायचे? यांची नियमावली नसून माणसाला केंद्रबिंदू मानून मानवी जीवनाची सामाजिक,आर्थिक,राजकीय, धार्मिक,सांस्कृतिक,आध्यात्मिक इत्यादी सर्वच अंगाचा विचार करणारा ग्रंथ आहे.
तो पूजनीय नाही तर आदरणीय आणि श्रद्धेय आणि निष्ठा बाळगावी अश्याच तोलामोलाचा ग्रंथ आहे.
संविधान म्हणजे कथा,पोथी पुराण नव्हे तर संविधान हा बुद्धिवादी,विवेकवादी,राष्ट्रवादी समाजवादी,लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षवादी,मानवतावादी असा हा ग्रंथ आहे.
माणूस आणि मानवी जीवनाचे कल्याण,वैभव,समृद्धी साधणारा ग्रंथ आहे.तो एक केवळ पुस्तक नसून,केवळ स्वप्नं नसून त्यात ध्येयवाद आहे,माणसाला,मानवी जीवनाला दिशा देणारा ग्रंथ आहे,दारिद्र्य गरीबी अदन्यान अंधश्रद्धा दूर नष्ट करणारा ग्रंथ आहे.
संविधान हा केवळ राजकीयच ग्रंथ नसून सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक, भौतिक आणि सर्वधर्म समभाव मानणारा ग्रंथ आहे.या ग्रंथाची स्तुती नव्हे पण जेव्हढी थोरवी सांगावी तेव्हढी कमीच पडते,असा हा समृद्ध व्यापक अथांग असा ग्रंथ आहे.
सर्वच विचारधारांना स्वातंत्र्य देणारा हा ग्रंथ आहे.स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय,सर्वांना समान संधी आणि प्रतिष्ठा प्रदान करणारा हा ग्रंथ आहे,म्हणजेच माणसाची गुलामी नष्ट करून त्यास मानवी हक्क अधिकारी मिळून देणारा हा ग्रंथ आहे.
तसेच माणसाचे कर्तव्य काय असले पाहिजे ? याचे पण स्पष्टीकरण देणारा हा ग्रंथ आहे.माणसाला ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार देणारा हा ग्रंथ आहे.अशा ह्या भव्य दिव्य ग्रंथाची आजची काय अवस्था आहे? याकडे बारीक नजरेने पाहणे हे प्रत्येक नागरिक आणि मतदाराचे कर्तव्य ठरते.
हे कर्तव्य आपण निभावलेच पाहिजे.कारण या संविधानाने आपणास एका स्वतंत्र देशाचा सार्वभौम असा मतदार राजा बनविले आहे.या देशातील प्रत्येक नागरिक स्वतंत्र आहे.कुणाचा गुलाम नाही,एव्हढेच नाही तर तो राजा आहे,कारण सत्तेत कुणाला पाठवायचे? आणि सत्तेत असलेल्यास परत बोलवायचे याचा अधिकार ” मतदार ” नागरिक या राजास आहे.
म्हणूनच ” मतदार राजा ” हा शब्दप्रयोग केला गेला आहे.याचा अर्थ या संविधानाने गुलामाला राजा बनविले आहे.एवढी ताकद या ग्रंथात आहे.ही शक्ती दुबळी होता कामा नये,कुणी हिरावून घेऊ नये म्हणून या ग्रंथास कायद्याचे संरक्षण दिले आहे.
तरी संविधानाची वर्तमान अवस्था काय आहे ,? याचे अवलोकन केले पाहिजे ते पुढील प्रमाणे.
ज्या आर एस एस या संघटनेला आणि त्याची राजकीय शाखा असलेल्या भाजपा या पक्षाला मुळातच हे संविधान मान्य नाहीं,तेच लोक याच संविधानाच्या आधारे आज सत्तेत बसलेत,आणि आपला ‘” विषमतावादी व्यवस्था ” हे धेय्य साध्य करण्याचे षडयंत्र करीत आहेत.
एकीकडे संविधान कपाळी लावायचे,आणि संविधानात बदल करायचे,संविधानाचे सर्व अंतरंग बदलायचे आणि केवळ सापळा ठेवायचा असे कटकारस्थान हे सत्ताधारी करताना दिसतात.
उदा….
१). संपत्तीचे केंद्रीकरण न करता विकेंद्रीकरण केले पाहिजे ,असे संविधान सांगते,परंतु भांडवलदार आणि जमीनदार यांची आधीच संपती जास्त आहे,त्यांची काढून घेण्या ऐवजी बँकांना त्यांनाच अधिकचे कर्ज द्यावे,त्यांनी ते बुडवावे,ते बुडविलेले कर्ज शासनाच्या तिजोरीतून ( म्हणजे जनतेचा पैसा ) द्यावे ,असे कृत्य हे वर्तमान सरकार करीत आहे.आणि जे शेतकरी ,कष्टकरी कष्ट करून गाळून अन्नधान्य पिकवतात,देशातील जनतेला पोसतात,जे कामगार कारखान्यात वस्तू निर्माण करून जनतेच्या सुख चैनीच्या गरजा भागवतात त्यांचे कर्ज मात्र माफ होत नाही.याचा अर्थ श्रीमंतांना अधिकच श्रीमंत करायचे,गरिबाना अधिकच गरीब करायचे,मध्यम वर्गीयांना मात्र जिथल्या तिथेच ठेवायचे असे धोरण या विषमतावादी सरकारचे चालले आहे.
2). सरकारी जमीन आणि कारखाने आणि उद्योग आणि कंपन्या या भांडवलदारांना विकण्याचा सपाटा लावला आहे.विमानसेवा रेल्वे ,बस सेवा,बँका हे फायद्यात असूनही हळू हळू विकण्यास सुरुवात झाली आहे.
३). शिक्षण मातृभाषेत न देता परकीय भाषेत दिले जात आहे,याचे कारण आकलन होऊ नये, मुले हुशार होऊ नयेत म्हणून हे षडयंत्र.मराठी शाळा बंद करणे,मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण हे सरकारनी मोफत दिले पाहिजे असे संविधान ने बंधन टाकले आहे,तसेच सर्वांना समान शिक्षण आरोग्य दिले पाहिजे असे संविधान सांगते,तरी हा नियम ,कायदा यांनी मोडीत काढला आहे.
४).जनतेनी निवडून दिलेले सरकार फोडण्याचे काम करीत आहेत,उमेदवारांना विकत घेत आहेत ,हे सारे घटनाबाह्य काम आहे.
५).लोकशाही जिवंत राहण्यासाठी काही स्वायत्त संस्था नेमून त्यांच्यात सरकारने हस्तक्षेप करू नये असे संविधान सांगते,पण निवडणूक आयोग,रिझर्व बँक, सी. बी.आय.,न्यायालये,महामंडळे अशा सर्वच स्वायत्त सरकारी संस्थात हस्तक्षेप करणे,तेथील प्रमुखाची नेमणूक करणे,आपणास हवे तसे त्यांना निर्णय देण्याबद्दल दबाव टाकणं,याचा अर्थ सत्तेचा गैरवापर करणे हे सरकारचे संविधान विरोधी काम चालले आहे.
६).सरकारने धार्मिक कार्य करू नयेत,कारण दत्ता ही धर्मनिरपेक्ष असली पाहिजे,तरच सर्व धर्मियांना सारखाच न्याय मिळेल,समतोल कल्याण करता येईल असे संविधान सांगते,पण हल्लीचे सरकार तर सर्वच देवळात पूजा मांडून बसले आहे.
७).एव्हढेच नाही तर जनतेच्या पैशातून शाळा रस्ते,दवाखाने,कारखाने,प्रवास वाहने आणि अन्नसेवा,निवारा,इत्यादी कल्याणकारी योजनासाठीच वापरावा असे संविधान सांगते,परंतु वर्तमान सरकार सरकारी तिजोरीतील जनतेचा पैसा हा केवळ देवळे बांधणे आणि देवळे पाडून त्याखाली मशिदी आहेत का? यावर अफाट पैसा खर्च करीत आहे.
८).गांधीजींचा खून केलेल्या गोडसे चे पुतळे उभारणे, जातीवादी ,धर्मवादी,विषमतावादी मनूच पुतळा पुतळ्याचे संरक्षण तेही कोर्टाच्या समोर ठेवणे.
९). राजधानीत संविधान जाळणे.
१०) भाजपचे मंत्री खासदार हे “आम्ही संविधान बदलण्यासाठीच तर सत्तेत आलोत”असे जाहीर वक्तव्य करणे…
११) कुंभमेळ्यात सर्व साधूनी हिंदुराष्ट्राची घोषणा करणे, नारे देणे,आणि सनातनी संविधान तयार असल्याचे जाहीर करणे,आणि यावर सरकार काहीच कार्यवाही न करणे, मुस्लिम समाजाचा विरोध जाहीरपणे करणे,दलीत मुस्लिम समाजाच्या व्यक्तींना सामूहिकपणे मारहाण करणे,त्यांना पाठीशी घालणे.
१२) विरोधी पक्ष संपवण्याचे जाहीरपणे सांगणे,म्हणजेच लोकशाही संपवून हुकुमशाही आणणे,याचा अर्थ.उघड उघड संविधानास चॅलेंज करणे होय.
शोधली तर अशी अनेक उदाहरणे सापडतील की जी संविधान विरोधी आणि संविधान बदलण्याचे कार्य जोमाने चालले आहे.याचा अर्थ मानवी हक्क संपुष्टात आणून या देशात परत हुकुमशाही प्रस्थापित करून एससी,एसटी,ओबीसी,अल्पसंख्याक धार्मिक जनतेस गुलाम बनविण्याचे आणि आर एस एस या विषमतावादी शोषण वादी संघटनेस अपेक्षित अशी धर्मांध आणि अंधश्रद्धा जोपासणारी बुद्धिहीन,मानवता विरोधी समाज निर्मिती करण्याचे स्वप्न साकार करायचे कार्य चालले आहे.त्यास विद्यमान सरकार जनतेचे असतानाही या संघटनेचे काम करीत आहे.
अशी संविधान ची वर्तमान अवस्था आहे.वेळीच सावध होऊन जनतेनी हा प्रतिगामी रथ रोखला पाहिजे.चला तर मग लागू कामाला,उशीर कशाला ?
लेखक :- दत्ताभाऊ तुमवाड…
सत्यशोधक समाज नांदेड….
दिनांक : 14 एप्रिल 2025 आंबेडकर जयंती…
फोन: 9420912309.
टीप : हा लेख प्रज्ञासूर्य बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचे जन्मदिनी सहृदय अर्पण.



