आळंदीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती साजरी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : भारतरत्न डॉ..बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आळंदी येथे विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

        त्याच अनुषंगाने आळंदी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अशोक रंधवे पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे व शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण तसेच उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

             यावेळी महादेव पाखरे, गोविंद ठाकूर, सचिन महाराज शिंदे, माऊली घुंडरे, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, डॉ.सुनील वाघमारे, मंगेश आंद्रे उपस्थित होते.

         शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण यांनी बोलतांना म्हणाले, संविधान म्हणजे देशात सुव्यवस्था प्रस्थापित करून ठेवण्याचा एकमेव उपाय अश्या महान संविधानाचे निर्माण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. तेव्हा त्यांच्या कार्याला विसरून चालणार नाही. विद्यार्थी दशेत त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपण कार्य करायला पाहिजे असेही ते पुढे म्हणाले. शिका संघटित व्हा संघर्ष करा. या त्यांच्या विधानाची अंमलबजावणी केले पाहिजे.