वैरागड येथे माळी समाजा तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

प्रतिनिधी//प्रलय सहारे

       वैरागड : – येथील समाज मंदिरामध्ये माळी समाजा तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

      कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्रिषरण-पंचशील-अष्ठगाथा घेण्यात आले. 

       कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजय खंडारकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश बनकर, जनार्धन नंदरधने, बालाजी बनकर, अजय बनकर आणि बंडू बडवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि उपस्थितांचे आभार विजय गुरूनुले सर यांनी केले. यावेळी गावातील नागरीत बहुसंख्येने उपस्थित होते.