रामदास ठुसे
नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीर कोलारा येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
या शिबिरात दिनांक१३ जानेवारीला उपजिल्हा रुग्णालय चिमूर व रेड रिबन क्लब तर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सिकलसेल, रक्तगट चाचणी, अँनेमिया, एच आय व्ही ची तपासणी करण्यात आली. कोलारा येथील २०० ग्रामस्थांनी तपासणी केली. या कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. हलगे डॉअश्विनी पिसे आयटीसी समुपदेशक कू कामिनी हलमारे, आहारतज्ञ डॉ जयश्री वाघमारे कु रिकूं जोगी, श्री गणेश जाधव आदित्य बाळचन्ने, कु तेजस्वी पेदांम वैज्ञानिक तंत्रज्ञ उपस्थित होते.
या निमिताने विविध आजारांचे कारणे जाणून घेतले. तसेच चुकीच्या आहार पध्दतीमुळे आरोग्यावर कसे परिणाम होतात सप्रमाण सांगितले.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी तथा विभागीय समन्वयक डॉ.प्रफुल राजुरवाडे,प्रा.डॉ.कत्रोजवार, प्रा.गजानन चव्हाण,प्रा.रिना भोयर यांनी परिश्रम घेतले. आरोग्य तपासणी शिबिरासाठी रासेयो स्वयंसेवकानी उदंड प्रतिसाद दिला.



