शिवसेना (उ. बा ठा.)पक्ष शाखा कांद्री तर्फे कुस्त्यांची भव्य इनामी आम दंगल पार पडली शांततेत.

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील कांद्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष शाखेच्या वतीने कुस्त्यांची भव्य इनामी आमदंगल कार्यक्रम आयोजित केला होता.

         कार्यक्रमाचे उदघाटन कन्हान पो.स्टे.चे ठाणेदार सार्थक नेहाते होते तर अध्यक्ष म्हणून शिवसेना पक्षाचे रामटेक विधानसभा प्रमुख श्री.विशालजी बरबटे उपस्थित होते.

        कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पक्षाचे उपजिल्हा प्रमुख श्री.प्रेम रोडेकर,विधानसभा सहसंपर्क प्रमुख श्री.सुत्तम मस्के,कामगारसेना जिल्हाप्रमुख श्री.समीर मेश्राम,युवासेना जिल्हाप्रमुख श्री.लोकेश बावनकर,विधानसभा संघटक श्री.रमेश तांदुळकर,कामगार सेना विधानसभा प्रमुख श्री. मस्के,मौदा संपर्क प्रमुख श्री.नरेश भोंदे उपस्थित होते.

         प्रमुख पाहुणे म्हणून पारशिवनी तालुका प्रमुख श्री. कैलास खंडार,युवासेना तालुका प्रमुख श्री.किशोर बावनकुळे, रामटेक तालुका प्रमुख निकुंज गराडे,तालुका संघटक श्री.गणेश मस्के,उपतालुका प्रमुख श्री. राजण मनगटे,श्री.सुनील सहारे,सर्कल प्रमुख श्री.जितेंद्र जंबे,श्री.फिरोज बाघाडे,कन्हान शहर प्रमुख श्री.प्रभाकर बावणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना कांद्री शहर प्रमुख श्री.सुरेश आंबीलदुके व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांनी केले. 

           कुस्तीचे पंच म्हणून ज्ञानेश्वर विधे पहलवान,कोठीराम चकोले पहलवान यांनी काम पाहिले.