लक्ष्मी नरसिंहाच्या विकास आराखड्यातील सर्वच ठेकेदाराच्या मनमानी कारभारची चौकशी होऊन नवीन पाणी पुरवठा चालू करण्यात यावा.:- सरपंच आर्चना सरवदे  — 260 कोटी नरसिंहपूर विकास आराखड्यातील गावच्या पाणी पुरवठ्याचे काम रखडले,तर ठेकेदाराचा मनमानी कारभार चालु आहे.

     बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर दिनांक प्रतिनिधी

          नीरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील लक्ष्मी नरसिंहाच्या 260 कोटी विकास आराखड्यातील नरसिंहपुर गावच्या पाणीपुरवठ्याचे काम रखडले ते आज अखेर काम बंदच आहे.

            नरसिंहपूर ग्रामपंचायत गावचे सरपंच अर्चना सरवदे, सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे ऊप सरपंच गुरूदत्त गोसावी,यांनी आनेक वेळा याबद्दल पाठपुरावा केला आहे.तरी पण पाणीपुरवठ्याची दखल घेतलेली नाही.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आसल्यामुळे जास्तीत जास्त निधी विकास कामासाठी दिलेला आसून उर्वरित आनेक कामे रेंगाळलेली आहेत.

          त्यापैकी जीवनावश्यक पाणी पिण्याच्या योजनेचे काम आर्धवट आसल्याने गावासाठी पिण्याच्या पाण्याची आडचण निर्माण झालेली आहे. गावामध्ये आणेक ठिकाणी जुन्या पाईपलान उघड्यावर आहेत.रहदारीमुळे उघड्यावर आसणाऱ्या पाईपलाईन लिकीज होउन. त्या ठिकाणी खड्ड्यात पाणी साचल्यामुळे घाणीचे साम्राज्य होऊन दूषित पाणी होत आहे.

           त्यामुळे होणाऱ्या डेंगू ,खोकला, मलेरिया , चिकन गुण्या ,यासारख्या आजाराला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. याबद्दल रोगराईसाठी या भागातील लोकांच्या तक्रारी वाढु लागल्या आहेत .

          राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने व माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्यामुळे लक्ष्मी नरसिंहाच्या विकास कामासाठी एवढा मोठा निधी मिळाला आहे. निधी मिळून सुद्धा पाणीपुरवठा चालू नाही ही लाजिरवाणी गोष्ट झाल्याचे समजून लागले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणा मुळे ग्रामपंचायतीवर खर्चाचा बोजा वाढू लागला आहे जुनी पाईपलाईनच्या लिकेजमुळे लाखो रुपये खर्चून सुद्धा उघड्यावरील पाईपलाईन हि नेहमीच लिकेज राहत आहे गेली सहा ते सात वर्षांपूर्वी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम चालू करून सुद्धा गावासाठी शुद्ध पाणी नाही नरसिंहपूर गावासाठी पाणीपुरवठा चालु नाही.

           लक्ष्मी नरसिंहाच्या आराखड्यातील पाणीपुरवठा चालू न झाल्यास नरसिंहपुर गावचे सरपंच आर्चना सरवदे, सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे, उपसरपंच गुरुदत्त गोसावी व ग्रामस्थ सर्व ग्राम पंचायत सदस्या सहित तहसील कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन जाण्यासाठी विद्यमान सरपंच आर्चना सरवदे व सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे यांनी या बद्दल ईशारा देण्यात आलेला आहे.