शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
प्रहार पक्षाचे पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पवित्र गुरुकुंज मोझरी नगरित शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.
त्यांच्या शेतकरी कर्जमुक्त करणाऱ्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्याला ११ वाजता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चिमूर तहसील कार्यालयाच्या पुढे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाला चिमूर तालुक्यातील मौजा सावरी (बिडकर) येथील सरपंच तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चिमूर तालुका अनुसूचित जाती प्रवर्ग अध्यक्ष लोकनाथ रामटेके यांनी पाठिंबा दिला आहे.तसे पत्र त्यांनी तहसीलदार चिमूर आणि इतर अधिकाऱ्यांना दिले आहे.
प्रहार पक्षाचे पक्ष प्रमुख व राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांचे गुरुकुंज मोझरी येथे चालु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ दि.१५ जुन २०२५ ला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजीत एक दिवशीय चक्काजाम आंदोलनास अनुसुचित जाती विभाग चिमुरच्या वतीने जाहीर पाठींबा दिला आहे.



