वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा नेरी वासींयांसाठी ठरतो आहे संतापजनक… –नागरिकांनी करायचे तरी काय? — कमालीचे दुर्लक्ष!..

 

 दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

     चंद्रपूर जिल्हातंर्गत मौजा नेरी गाव हे राजकीय चळवळीचे ठिकाण आहे.तद्वतच १७ सदस्य ग्रामपंचायत म्हणून विविध कामातंर्गत वळण घेतो आहे,विस्तारतो आहे.

        मात्र या ठिकाणचा दिवसा व रात्रोला वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा हा नेरी वासींयासाठी संतापजनक डोकेदुखी ठरू लागला आहे.

            मौजा नेरी सह इतर गावांचा विद्युत पुरवठा केव्हा बंद केला जाईल किंवा खंडित होईल याचा नेम नाही,अशा पध्दतीची चिंताजनक स्थिती सध्यास्थित नेरी व परिसरातील विद्युत ग्राहक अनुभवताना दिसत आहेत.

         विज वितरण कंपनी कनिष्ठ अभियंता नेरीच्या कार्यालयातंर्गत कनिष्ठ अभियंता,लाईनमन व त्यांचे सहकारी वारंवार होणाऱ्या खंडित विद्युत पुरवठ्याकडे जातीने लक्ष केंद्रित करतील काय?हा प्रश्न नेरीवासींयासाठी सध्यातरी गंभीर बनला आहे.

          नेरी येथील वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा हा एक दोन किंवा पाच मिनिटांसाठी होत नाही तर त्याचा वेळ सांगणे अवघड असते.मात्र महत्वपूर्ण मुद्दा हा आहे की नेरी येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित का म्हणून होतोय?

      विद्युत खंडित दिवसा होतोय पण रात्रोच्या वेळी सुध्दा अनेकदा होतोय.यामुळे विज वितरण कंपनी कनिष्ठ अभियंता कार्यलय नेरी अंतर्गत कर्तव्यावर असलेले कनिष्ठ अभियंता,लाईनमन व त्यांचे सहकारी यांच्या कार्यपद्धतीवर नेरी व परिसरातील नागरिक कमालीचे नाराज आहेत व त्यांच्या गलथान कारभारामुळे हैराण झाले आहेत.

        वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा होऊच नये यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी नेरी येथील नागरिकांनी घ्यायची काय? याबाबत तरी सार्वजनिकरित्या खुलासा कनिष्ठ अभियंता यांनी करणे आवश्यक आहे.

             वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे कारणे काहीही असोत,मात्र याकडे विज वितरण कंपनीच्या संबंधितांचे होणारे दुर्लक्ष नेरी वासींयासाठी संतापजनक ठरत आहे,या वास्तव्याला नाकारुन चालणार नाही…