Home Maharashtra ती “अट रद्द करा,अन्यथा मौजा मदनापूर गावकऱ्यांच्या वतीने झुनाबाई कुटीवर होणार आंदोलन?...

ती “अट रद्द करा,अन्यथा मौजा मदनापूर गावकऱ्यांच्या वतीने झुनाबाई कुटीवर होणार आंदोलन? — महिलांचा वनविभागाला गर्भरीत इशारा..‌

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

 चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्हातंर्गत जागतिक स्तरावर नावलौकिक असलेल्या ताडोबा बफर झोन अंतर्गत चिमूर तालुक्यातील मौजा मदनापूर येथे मागील पाच दिवसा पासून वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम यांनी टाकलेल्या जाचक अटीमुळे गावातील महिला व पुरुष आक्रमक झाले आणि मदनापूर वरून सफारी पर्यटन गेट बंद करण्यात आले. 

           सदर अटी व शर्ती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी स्वतः लावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.गेल्या पाच दिवसापासून कंपीग स्वयंपाक गृह बंद आहे.मदनापूर पर्यटन गेट पण बंद करण्यात आला आहे. 

      मात्र,पर्यटकांना कोलारा गेट वरून मदनापूरच्या जंगलात सफारी करण्यात येत आहे. त्यामुळे वनविभागाला नफा होत आहे.मात्र बिचाऱ्या गरीब महिलांचे नुकसान होत आहे.

          वनविभागाला मिळणारे पर्यटन रक्कम आणि स्थानिक मालकाच्या जीप्सी चालक व गाईड यांना कोलारा या गेट वरून सफारीचा मार्ग मोकळा करून दिला आहे.यातून गाईड जिप्सी चालक-मालक यांना नफा मिळत आहे. 

         मात्र स्थानिक गरीब आदिवासी महिलांची,बचत गटाची वनपरीक्षेत्र अधिकारी यांचेकडून जाणीवपूर्वक पिळवणूक केल्या जात आहे.यामुळे संपूर्ण मदनापूर गावकरी वनविभागाविरुद्ध दंड थोपटून उभे झाले आहेत.

           गेल्या पाच दिवसा पासून बंद असलेल्या मदनापूर गेटकडे प्रकल्प संचालक ताडोबा बफर यांनी लक्ष घालून गावकरी व वनविभागतील स्थानिक अधिकाऱ्यांच्या हेकेखोर पणाची चौकशी करून प्रकरण निकाली काढतील की,ते फक्त आपल्या चुकीच्या अधिकाऱ्याची पाठराखण करतील याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

       वनपरीक्षेत्र अधिकारी स्थानिक नागरिकांशी संवाद न करता निगरगट्ट भूमिका घेत आहे.मी गावात येणार नाही,तुम्हाला गरज आहे तर तुम्ही माझ्याकडे या,मी येणार नाही, अशाप्रकारे मी पणाने वागून गावकरी यांना कमी लेखण्याचा प्रकार वनपरिक्षेत्राधिकारी करीत असल्याची संतप्त भावना मौजा मदनापूर येथील गावकऱ्यांन व्यक्त केली. 

       त्यामुळे शासकीय अधिकारी जनतेच्या सेवेसाठी आहेत की,जनता अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी नियुक्त केली जातात कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

           मौजा मदनापूर येथील गटातील महिलांची कोणतेही चूक नसतांना विनाकारण अट टाकून महिलांना व गावकरी जनतेला नाहक त्रास देणाऱ्या अधिकारी यांना तात्काळ चौकशी करून प्रकरण निकाली काढावे अन्यथा गावकरी जनतेच्या वतीने मदनापूर जंगलात असलेल्या झुनाबाई कुटीवर जाऊन आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा ईशारा यावेळी गावकऱ्यांनी आणि महिलांनी दिला.