रामदास ठुसे
नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी दिव्य वंदना आधार फाउंडेशन ला रुग्णवाहिका भेट दिली असता शुभम पसारकर यांचे कडे सुपूर्द करण्यात आली.
दिव्य वंदना आधार फाउंडेशन ही समाजातील निराधार मनोरुग्ण असलेल्याना आधार देण्याचे कार्य असून चिमूर तालुक्यातील जामगांव येथे फाउंडेशनचे रोडवरील बेवारस, बेघर, भिक्षेकरी निराधार मनोरुग्ण पूर्णवसन केंद्र आहे. त्या ठीकानी निराधार मनोरुग्णाना आधार देण्याचे काम सुरु आहे.
मनोरुग्ण साठी उपचारासाठी रुग्णवाहिकाची आवश्यता होती.आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी रुग्णवाहिका देण्याचा शब्द दिला होता.शब्द पूर्ण करीत रुग्णवाहिका भेट देत सुपूर्द करण्यात आली.
दिव्य वंदना आधार फाउंडेशनचे मुख्य संचालक शुभम पसारकर यांचे कडे चावी देऊन सुपूर्द करण्यात आली असता यावेळी भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे, रमेश कंचर्लावार आदी उपस्थित होते.



