डॉ.आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थी जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकले…

रुपेश बारापात्रे

शहर प्रतिनिधी

आरमोरी:-

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकले, जिल्हास्तरीय स्पर्धेत १०० मीटर रनिंग या स्पर्धेत वर्ग ८ विचा विद्यार्थी रोहित गणपत हलामी याने द्वितीय क्रमांक पटकाविला तर गोळा फेक स्पर्धेत वर्ग ११ वी चा विद्यार्थी तन्मय डंबाजी कलसार याने द्वितीय क्रमांक पटकाविला दोन्ही विद्यार्थ्यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

        विजेत्या दोन्ही विद्यार्थ्यांचे प्रेरणा सामाजिक, सांस्कृतिक, बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष मदन मेश्राम तसेच संस्थेचे सचिव ऍड. प्रशांत मेश्राम, प्राचार्य आर.एस. बांबोळे, पर्यवेक्षक कु. एस. एन. गेडाम क्रीडा शिक्षक डी. डी. चापले, पि. के. दुधे व प्रसिद्धी प्रमुख हंसराज बडोले तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून स्पर्धेत यश संपादन करण्याचे शुभेच्या दिल्या आहेत.