वैक्सिन आणि अनाज फुकट दिले म्हणून भाजपाला मतदान करण्याचे,”महिला भगिनींना आवाहन!किती सयुक्तीक?”ही तर गरीब महिलांची थट्टाच! — मग!कोरोना काळात ५७० अब्ज डॉलर्स रुपयांचे परदेशी कर्ज भारतावर कसे काय झाले होते? — रक्षाबंधन कार्यक्रम… अभ्यंकर मैदान,२०२३…. भाग – २ क्रमशः…

 

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

           भारत सरकारचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी(भाजपा पक्ष) यांनी फुकट वैक्सिन,फुकट अनाज तुम्हाला कोरोना काळात दिले व महाराष्ट्र शासनाद्वारे महिलांसाठी फुकट बससेवा सुरू केलीय,यामुळे महिला भगिनींनो तुम्ही भाजपालाच मतदान द्यायला पाहिजे असे आवाहन आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या रक्षाबंधन कार्यक्रमा निमित्ताने चिमूरच्या इतिहासिक अभ्यंकर मैदानावरुन भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी उपस्थित महिला भगिनींना केले होते.

             कार्यक्रम आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या रक्षाबंधनाचा होता.यामुळे त्या भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष असल्या तरी मतदान मागण्यावर भाष्य करण्याची गरज चित्राताई वाघ यांना या कार्यक्रमा प्रसंगी नव्हती.

           त्यांनी आमदार बंटीभाऊ भांगडिया आणि महिला भगिनी यांच्यातील ऋणानुबंध यावर जेवढे भाष्य करायचे होते तेवढे करायला पाहिजे होते आणि हेच संयुक्तिक होते,असे म्हणणे चुकीचे मानण्यात येवू नये.

             पण,भाजपा पक्ष आमदाराचा रक्षाबंधन कार्यक्रम असल्याने राजकीय रंग कार्यक्रमाला आणणे अपेक्षित होते,यात विशेष असे काही नवल नाही.

              मात्र या कार्यक्रमांतर्गत फुकट वैक्सिन व फुकट अनाज देण्याचा मुद्दा अतिशय संवेदनशील व तितकाच वेदनादायक होता.

            भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांना प्रश्न आहे की,कोरोना काळात खरोखरच वैक्सिन आणि अनाज गोरगरीब नागरिकांना फुकट दिले गेले होते काय?

***

मुद्दा क्रमांक १ :-

            तर पहिल्या मुद्या प्रमाणे असे की,एखादा साथीचा आजार हा नागरिकांच्या जिवितहानीस कारणीभूत ठरत असेल तर केंद्र सरकारला परिस्थिती नुसार ३ वर्षांपर्यंत टप्याटप्याने आणिबाणी लागू करता येते व साथीच्या आजारांन्वये सर्व प्रकारची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि देशातील नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी मुबलक प्रमाणात अत्यावश्यक व्यवस्था कार्यान्वित करण्याची व त्याच जलदगतीने नागरिकांना सुविधा देण्याची जबाबदारी भारतीय संविधानाने केंद्र सरकारला दिली आहे व तसे केंद्र सरकारचे जबाबदेही नैतिक कर्तव्य देशातील नागरिकांप्रती आहे हे संविधान सांगते आहे.मग केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असो..

           हे भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी रक्षाबंधना निमित्ताने अभ्यंकर मैदानावर उपस्थित महिला भगिनींना सांगणे आवश्यक होते.

***

मुद्दा क्रमांक २ :-

             केंद्र सरकारने कुठल्याही प्रसंगानुरूप (संविधाना नुसार) देशात एकदाची आणिबाणी घोषित केली व आणिबाणी नुसार संवेदनशील स्थिती लागू केली की,देशातील नागरिकांच्या सुरक्षेची,संरक्षणाची,रक्षणाची जबाबदारीच केंद्र शासनाची असते.केंद्र सरकार हे राज्य सरकारे व केंद्र शासित प्रदेश यांच्या सहकार्याने साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी व नागरिकांना रोगमुक्त करण्यासाठी सर्थीचे प्रयत्न करतय आणि लाकडाऊन काळात देशातील नागरिकांची सर्व प्रकारची देखभाल करतय.. आणि केंद्र सरकारनी करायलाच पाहिजे असे संविधान निर्देशित आहे.

            हे सुध्दा भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी रक्षाबंधन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या चिमूर तालुक्यातील महिला भगिनींना अवगत करून देणे महत्त्वाचे होते.

***

मुद्दा क्रमांक ३ :-

             चिमूरच्या इतिहासिक अभ्यंकर मैदानावर अनभिज्ञ महिला भगिनींना संबोधित करताना चित्राताई वाघ म्हणाल्या होत्या की कोरोना काळात भाजपा सरकारचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना वैक्सिन व अनाज फुकट दिले म्हणून भाजपाला मतदान द्यावे व आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना परत निवडून द्यावे.हि एक प्रकारची कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला भगिनींची थट्टाच होती.

            चित्राताई वाघ यांना प्रश्न आहे की,भाजपाने आपल्या खिशातल्या रुपयांनी देशातील नागरिकांना वैक्सिन व अनाज फुकट दिले होते काय?

***

मुद्दा क्रमांक ४ :-

            भारतीय संविधानाने बहाल केलेल्या अधिकारान्वये देशातील नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर कुठल्याही पक्षाच्या केंद्र सरकारला व देशातील राज्य सरकारे,केंद्र शासित प्रदेश,यांना गदा आणता येत नाही किंवा देशातील नागरिकांच्या जिवितहानीस कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होईल असी कृती करता येत नाही.याचबरोबर देशातील नागरिकांना उपवासी ठेवता येत नाही,उपवासी मारता येत नाही.

          हे भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांना माहिती नाही काय?

**

मुद्दा क्रमांक ५ :-

             सन २०१७ ला भाजपाच्या केंद्र सरकारने २७ मिलियन डॉलर्सचे रोखे कर्ज आंतरराष्ट्रीय स्तरावरावरुन मंजूर करुन घेतले होते व हे कर्ज भारताला केंद्र सरकारच्या मागणी नुसार टप्याटप्याने प्राप्त करून घ्यायचे होते.

           यानुसार पहिल्या टप्प्याचे आंतरराष्ट्रीय रोखे कर्ज घेऊन कोरोणाच्या किट्स घेतल्या व दुसऱ्या टप्प्यातील आंतरराष्ट्रीय रोखे कर्जातंर्गत सिरम इन्स्टीट्यूट आॅफ इंडिया आणि आक्सफोर्ड एस्ट्राजेनेका यांच्या संयुक्त सहभागातून बनलेल्या कोरोना व कोविशील्ड वैक्सिनचे रुपये टप्याटप्याने प्राधान्याने,( प्रत्येक वैक्सिन मागे टप्प्याटप्प्याने १,५०० रुपये,१,२०० रुपये,१००० रुपये,प्रमाणे) संबंधित कंपनीला केंद्र सरकारने अदा केलीत व सेवटच्या टप्प्यात २२५ रुपया प्रमाणे प्रत्येक को-वैक्सिनचे रुपये सुध्दा वरील कंपनीला देण्यात आली.तद्वतच देशांतर्गत इतर गरजांवर सुध्दा कर्ज रोखे अंतर्गत रुपये खर्च करण्यात आली.

             हे भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांना माहिती नाही काय?

***

मुद्दा क्रमांक ६ :-

            केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय रोखे कर्ज घेते तेव्हा देशातील महत्त्वाच्या तिनं चल बॅंक(केंद्र शासन मान्य संस्था) या कर्जफेडीसाठी जबाबदार असतात‌‌.यात देशाची वाणिज्य बॅंक आंतरराष्ट्रीय रोखे कर्जाचा बोजा ३८ टक्के घेते तर अनुक्रमे भारतीय जिवन निगम विमा कंपनी ३० टक्के व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ३० टक्के कर्जाचा बोजा हमी अंतर्गत सातत्याने उचलतो आहे.

               वाणिज्य बॅंक,रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया,भारतीय जिवन बिमा निगम लिमिटेड कंपनी या कुणाच्या भरवशावर कर्ज फेडीची गारंटी देतात तर देशातील नागरिकांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहाराच्या भरवशावर..

              मग देशातील नागरिकांच्या दैनंदिन व दिर्घकालीन आर्थिक व्यवहाराच्या बलावर भाजपाच्या केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय कर्ज घेतले असेल व ते कर्ज पेड करत असेल तर ज्या नेजल वैक्सिनसाठी,इंट्रानेजल वैक्सिनसाठी व को-वैक्सिन साठी व कोरोना साहित्यासाठी,विनामूल्य अनाज वितरण व्यवस्थेसाठी आणि इतर गरजांवर खर्च करण्यासाठी आंतरराष्ट्रीय रोखे कर्जातंर्गत भाजपाच्या केंद्र सरकारने रुपये खर्च केले याचा अर्थ असा की नागरिकांना भाजपाच्या केंद्र सरकारने काहीही फुकट दिले नाही हे गृहीत धरले पाहिजे.

              देशातील नागरिकांच्याच दैनंदिन व दिर्घकालीन आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून व इतर व्यवसायीक व्यवहाराच्या माध्यमातूनच केंद्र सरकार हे देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी,संरक्षणासाठी व त्यांची जिवितहानी टाळण्यासाठी सर्व उपाययोजना करते हे लक्षात घेतले पाहिजे.

          अर्थात केंद्र सरकार व राज्य सरकारे,केंद्र शासित प्रदेश हे देशातील नागरिकांना फुकट काहीच देत नाही हे स्पष्ट आहे.

              यामुळे हा मुद्दा सुध्दा भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी रक्षाबंधन कार्यक्रमा निमित्ताने चिमूरच्या इतिहासिक अभ्यंकर मैदानावर उपस्थित असलेल्या महिला भगिनींना स्पष्टपणे सांगणे कठीण नव्हते.

***

मुद्दा क्रमांक ७ :-

          कोरोना काळात भाजपाच्या केंद्र सरकारने ५७० अब्ज डॉलर्स रुपयांचे आंतरराष्ट्रीय रोखे कर्ज घेतले होते.हे सत्य भाजपाच्या सर्व केंद्रीय नेत्यांना,राज्य स्तरीय नेत्यांना व देशांतर्गत तमाम भाजपाच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना लवपिता येणारे नाही.

           याची जाणिव भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांना असावी?

         भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी चिमूरच्या इतिहासिक अभ्यंकर मैदानावर रक्षाबंधन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या चिमूर तालुक्यातील महिला भगिनींना संबोधित करताना म्हटले होते की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तुम्हाला कोरोना काळात वैक्सिन व अनाज फुकट दिले आहे म्हणून भाजपालाच मतदान दिले पाहिजे.

          भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांना प्रश्न आहे की तुमच्या भाजपा केंद्र सरकारने(त्यांच्या म्हणण्यानुसार देशाचे सरकार नाही.) देशातील तमाम नागरिकांना फुकट वैक्सिन व फुकट अनाज खरोखरच दिले होते का? परत प्रश्न!

           कोरोना काळात वैक्सिन व अनाज फुकट दिले म्हणणे ही चिमूर तालुक्यातील महिलांची,नागरिकांची आणि देशातील तमाम नागरिकांची थट्टाच नाही काय? याचबरोबर देशातील नागरिकांच्या गरीबीला अनुसरून लांचनास्पद संबोधने हे अपमानजन व मानहानीकारक कर्तव्य नाही काय?याचा सारासार विचार राजकारण्यांनी करणे आवश्यक आहे.