मुनघाटे महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी.

धानोरा /भाविक करमनकर 

स्थानिक धानोरा श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे समान संधी केंद्र व रा से यो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंकज चव्हाण सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ आर किरमिरे सर डॉ झाडे सर वाघ सर इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी प्राचार्य डॉ पंकज चव्हाण सर यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच डॉ आर किरमेरे सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या संघर्षाची गाथा विद्यार्थ्यांना पटवून सांगितले कार्यक्रमाचे संचालन रा से यो विभाग प्रमुख प्राध्यापक ज्ञानेश बनसोड यांनी केले तर आभार डॉ प्रियंका पठाडे यांनी केले यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ संजय मुरकुटे डॉ धवणकर प्रा पुण्यपरेड्डीवार प्रा तोंडरे प्रा भैसारे डॉ गोहणे व प्रशासकीय कर्मचारी व महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.