श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयातील सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप… — संस्था पदाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थीनीना सायकल सुपूर्द..

कुरखेडा तालुका प्रतिनिधि

           आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित‌ श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथे शैक्षणिक सत्र २०२४ मध्ये शिक्षण घेत असलेल्या वर्ग आठवी ते बारावी च्या सावित्रीच्या लेकींना मानव विकास मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या सायकलचे वाटप संस्था पदाधिकारी व प्राचार्य यांच्या हस्ते 12 विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.

           यावेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर सुखद आनंदाची पर्वणी पाहायला मिळाली असून शाळेमध्ये येण्याजाण्या करिता विद्यार्थिनी आता सायकलचा उपयोग करणार आहेत..

           यावेळी संस्था कोषाध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष वामनराव फाये , संस्था सचिव दोषहरराव फाये, संस्था सहसचिव प्रा.नागेश्वर फाये प्राचार्य ,एल. डब्लू .बडवाईक विशेष अतिथी मुख्याध्यापक के.एस.उंदीरवाडे संस्था सचिव दोषहरराव फाये संस्था सहसचिव प्रा.नागेश्वर फाये, शिक्षक नरहरी माकडे प्राध्यापक , विनोद नागपूरकर, एस.आर. कोडापे,एस.बी.शिपपूरवार,, एल.आर.राऊत, वासुदेव मस्के, व्हीं.व्ही. नाकतोडे शिक्षक व श्रीराम विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उपस्थीत होते.