माणसाच्या शरीराचा सर्वात वरचा भाग म्हणजे डोकं होय, ह्या डोक्याला अत्यंत कठीण म्हणजे न फुटणारी अशी एक हाडाची कवठे असते, त्या कवठेखाली मागच्या बाजूला दोन मेंदू आहेत, एक डाव्या बाजूचा मेंदू आणि दुसरा उजव्या बाजूचा मेंदू.
माणसाने आपले व्यवहार सुसह्य व सुरळीत करण्यासाठी व्यवहारासाठी म्हणून भाषा निर्माण केली त्यासाठी आधी त्यांनी शब्द तयार केले त्यानंतर काही शब्दांची म्हणून एक वाक्य तयार केले, आणि दोन पेक्षा जास्त वाक्यांचे मिळून एक भाषा तयार झाली. जे अनेक शब्द तयार करण्यात आले किंवा तयार केले गेले त्यात मन आणि बुद्धी हे दोन शब्द माणसाने शोधून काढले, त्यामुळे व्यवहार सोपा झाला.
विज्ञान शास्त्र असे सांगते की, माणसाच्या डाव्या मेंदूत आणि उजव्या मेंदूत काही ग्रंथी आहेत, त्या ग्रंथीतून स्त्राव निर्माण होतात, अर्थात डाव्या मेंदूतून निर्माण होणारे स्त्राव म्हणजे बुद्धीचे तरंग आणि उजव्या मेंदूतून म्हणजे मेंदूतील ग्रंथीतून निर्माण होणारे स्त्राव म्हणजे मनाचे तरंग होत, अर्थात हे तरंग माणसाच्या भौतिक परिस्थितीतून किंवा बहुतेक परिस्थितीचे प्रतिबिंब मेंदूवर पडल्यामुळे हे स्त्राव निर्माण होत असतात, याचा अर्थ माणसाच्या भोवतीचे वातावरण तसेच त्याची प्रकृती त्याचा स्वभाव यानुसार मेंदूतील ग्रंथी मध्ये हे स्त्राव निर्माण होत असतात किंवा मेंदूवर तसा प्रभाव पडल्यामुळे ग्रंथी स्त्राव निर्माण करतात अर्थात ही निसर्गाची जडणघडण आणि क्रिया आहे, हा भौतिक विचार विज्ञान सांगते, प्रयोगशाळेतील प्रयोगातून वैज्ञानिकांनी मांडलेले हे विचार आहेत.
मानसशास्त्रज्ञ असे म्हणतात की “बुद्धीही स्थिर असते म्हणजे बुद्धीची प्रकृती किंवा बुद्धीचा स्वभावच स्थिर आहे आणि मन हे अस्थिर असते म्हणजेच मनाची प्रकृती किंवा स्वभाव हा अस्थिर आहे, म्हणजेच चंचल आहे.
जी माणसे डाव्या मेंदूची आहेत म्हणजेच डाव्या मेंदूच्या आधारे व्यवहार करतात त्यांना डाव्या विचाराचे किंवा डावे लोक म्हणतात तसेच जी माणसे उजव्या मेंदूच्या आधारे व्यवहार करतात म्हणजेच मनाच्या आदेशाने चालतात किंवा मनाचा सहारा घेऊन चालतात ती माणसे म्हणजे उजव्या विचाराची माणसे, म्हणजेच उजवे आणि डावे असा हा प्रकार मानसशास्त्रज्ञाने केलेला आहे.
मनाचा स्वभाव चंचल असल्यामुळे मनात च्या सहाऱ्याने जे लोक व्यवहार करतात ती माणसे जीवनात सतत भरकटत असतात, कुठेच स्थिर नसतात, या उलट बुद्धीच्या सहाऱ्याने चालणारी माणसे पायाकडे न पाहता अगदी समोर पाहून चालत असतात, हे दूरदर्शन असतात, यांना दूरचे दिसते, भविष्य कळते, त्यानुसार ती माणसे निर्णय घेत असतात, ही माणसे सहजासहजी बदलणारी नसतात, कारण यांच्यावर भौतिक परिस्थितीचा ताबडतोब परिणाम होत नसतो. अर्थात हा मानसशास्त्राचा विषय आहे.
माणसाला स्वप्न पडतात, या स्वप्नाचे दोन प्रकार आहेत. एक निद्रित अवस्थेतील स्वप्न आणि दुसरा प्रकार म्हणजे जागृत अवस्थेतील स्वप्न. जागृत अवस्थेतील स्वप्न म्हणजे माणूस प्रत्यक्ष व्यवहार करताना काही स्वप्न उराशी बाळगून तो व्यवहार करत असतो, प्रत्येक माणूस हा स्वप्नाळू असतो, त्याची काही स्वप्न असतात, व्यवहारिक आहे, जो वस्तुस्थितीला धरून विचार करतो, जो सत्य काय असत्य काय, योग्य काय अयोग्य काय, चांगले काय आणि वाईट काय, आपण जो विचार करीत आहोत, निर्णय घेत आहोत, त्याचे चांगले वाईट परिणाम काय आणि कसे होतील,? असा विचार करीत जो व्यवहार करतो किंवा निर्णय घेतो असा माणूस डाव्या मेंदूचा किंवा डाव्या विचाराचा किंवा बुद्धीच्या आधारे साहाऱ्याने चालणारा असतो आणि असा माणूस हा व्यवहारिक स्वप्न पाहत असतो आणि त्यानुसार त्याची कृती होत असते, आणि जी माणसे म्हणजेच ज्यांना व्यवहार कळत नाही याचा अर्थ जे अज्ञानी आहेत, जे भावनाशील आहेत, जे परिस्थितीनुसार चालतात, जिकडे वारे वाहील तिकडे ते वाहतात, जिकडे पाण्याचा प्रवाह आहे त्या प्रवाहा नुसार ते पोहतात, अर्थात अशी माणसे वाऱ्याप्रमाणे आणि पाण्याप्रमाणे वाहत जातात, त्यांना ना उठले ध्येय असते, ना कोणते टारगेट असते, ना कोणती दिशा असते, ना कोणता संकल्प असतो, अशी ही ध्येयहीन दिशाहीन संकल्पहीण माणसे म्हणजे हे भावनाशील माणसे असतात जे उजव्या मेंदूची असतात, किंवा उजव्या मेंदूच्या आधारे म्हणजेच उजव्या मेंदूचा आधार घेऊन चालणारे असतात, म्हणजेच मन हाच यांच्या विचाराचा आधार असतो, म्हणून ही मंडळी अज्ञान आणि भटकी आणि भरकटलेले असतात.
डोळे उघडे ठेवून, जागृतपणे जी माणसे स्वप्न पाहतात आणि त्यानुसार व्यवहार करतात त्या माणसांना कदाचित अनेक अडचणी येतील परंतु त्यांचा शेवट हा चिरंतन स्थिर आणि चांगलाच असतो, कारण त्यांना सत्याचा मार्ग सापडलेला असतो. आणि जी माणसे झोपेत स्वप्न पाहतात अशी माणसे अर्थात अशांना सत्य काय ते उलग उलगडलेले नसते, अर्थात व्यवहारातील काही सुखदुःखे पाहून त्याचे प्रतिबिंब त्यांच्या मनावर उमटते आणि तेच म्हणजे त्याचेच स्वप्न रात्री झोपेत किंवा दिवसाच्या झोपेत पडतात, हे झोप येतील स्वप्न असतात म्हणून ते खरेच असतात याची गॅरंटी नसते बहुतांशी ते खोटेच असतात, जसे शेख चिली च्या गोष्टी किंवा अलनास्करच्या गोष्टीत आपण वाचतो तसे.
खरे तर माणसाला झोपेत पडलेली स्वप्ने आणि त्या स्वप्नाचा विचार करणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हे केवळ शेख चिली सारखेच आहे, झोपेतील स्वप्न ही खरी नसतात, तर ती भासमान असतात, ती सत्य नसतात. आणि जागृतपणे माणूस जी स्वप्न पाहतो आणि ती साखर करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही ना काही तरी त्याच्या हाती लागते, एवढे मात्र खरे आहे, म्हणजे सत्य आहे.
देशाची आणि माणसाची भौतिक व्यवस्था म्हणजे आर्थिक सामाजिक कौटुंबिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक आध्यात्मिक ही जी व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेचे जे परिणाम आहेत त्या परिणामाचा प्रभाव माणसावर होतो म्हणजेच माणसाच्या मनावर आणि बुद्धीवर होत असतो, बहुतेक परिस्थितीचा परिणाम जेव्हा माणसावर होत असतो त्यावेळी तो माणूस बहुतेक गोष्टी कोणत्या आणि किती आणि किती प्रमाणात स्वीकारतो यावर त्याचे जागृत अवस्थेतील किंवा निद्रित अवस्थेतील स्वप्न ठरत असते, अर्थात गरिबांनी पाहिलेले स्वप्न आणि श्रीमंतांनी पाहिलेले स्वप्न यातही फरक असतो गरिबांची श्रीमंत होण्याची स्वप्ने ही सर्वांनाच साध्य होतात असे नाही याचे कारण येथील भौतिक विषमता, तरीपण काही गरीब माणसे किंवा मध्यम वर्गीय माणसे आणि साहित्यिक विचारवंत सुद्धा अशी स्वप्ने पाहतात की आपणास अंबानी अडाणी टाटा बिर्ला व्हायचे आहे, त्याच्यासारखे स्वर्गसुख आपणास पहावयाचे आहे, असा विचार करताना टाटा बिर्ला अंबानी यांचे पूर्वज जरी गरीब होते आणि ते श्रीमंत झाले त्याचप्रमाणे आपणही होऊ शकतो अशा प्रकारच्या खोळ्या कल्पना पाहणे हे अवास्तव आहे, कारण भौतिक व्यवस्था परिस्थिती ही विषमतेची असेल किंवा विषमतावादी सरकार असेल तर हे सगळ्यांनाच शक्य होत नाही, कारण विषमतावादी व्यवस्था ही शोषणावर आधारित आहे, पिळवणुकीवर आधारित आहे, जिथे एक आयत खाऊ वर्ग आहे तर दुसरा श्रमिक कष्टकरी वर्ग आहे, आणि आई तर खाऊ वर्ग श्रमिका आणि कष्टकऱ्यांच्या श्रमाचे शोषण करत असतो, ग्राहकांचे शोषण करत असतो, त्यातून तो नफा कमवतो, नफा तोही भरमसाठ कमावतो, बहुसंख्य लोकांना अल्पसंख्यालोक गुलामाची वागणूक देतात, म्हणून ते श्रीमंत होत असतात. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन साऱ्याच गरिबांनी जर टाटा बिर्ला अंबानी अडाणी व्हायचे स्वप्न पाहत असतील तर साऱ्यांनाच ते शक्य नसतात उलट गरिबामधले जे स्वार्थी चतुर बदमाश कपटी असतात ते शोषकाची भूमिका पार पाडतात म्हणून गरिबातील काही बोटावर मोजण्याएवढे लोकच गर्व श्रीमंत होऊ शकतात अशीही विषमतेची व्यवस्था असते, परंतु समतेची व्यवस्था जर भौतिक असेल म्हणजेच भौतिक व्यवस्था जर समतेची असेल तर समतेच्या व्यवस्थेमध्ये कुणालाही सोशल पिळवणूक अन्याय अत्याचार करण्याची संधीच मिळत नाही, कारण या व्यवस्थेत सगळ्यांचा दर्जा सारखाच असतो. म्हणून विषमतावादी व्यवस्थेत माणसाला पडणारी स्वप्न हे निद्रित अवस्थेतील स्वप्न आहेत असे समजावे,
विषमतेची व्यवस्था ही जे लोक बदमाश आहेत दुष्ट आहेत कपटी आहेत द्वेषी आहेत स्वार्थी आहेत जे अहंकारी आहेत ज्यांना मोह आहे असे लोक मालक होण्याचे स्वप्न पाहतात आणि इतरांना गुलाम करण्याचे स्वप्न पाहतात आणि जे बिचारे सरळ मार्गाने सत्याच्या मार्गाने खरे चालणारे लोक असतात किंवा त्यांना दुष्ट करणे कर्म करणे म्हणजे पाप वाटते अशी माणसे बहुजन वर्गामध्ये असतात ती बिचारी गरिबीची अवस्थेत आपले जीवन व्यतीत करत असतात अशी ही विषमतावादी व्यवस्था असते, या व्यवस्थेत माणूस सुख आनंद शांती संरक्षण समाधान मिळण्याचे जे स्वप्न पाहतो ते केवळ निर्जीत अवस्थेतच पाहू शकतो व्यावहारिक अवस्थेत बहुजन समाज ही स्वप्ने पाहू शकत नाही पाहिली तरी ते साकार होणार नाहीत, हे ज्ञान ही जागृती प्रत्येक माणसाला होण्याची गरज आहे, अर्थात असे ज्ञान अशी जागृती म्हणजेच व्यावहारिक स्वप्नच होय, की जे प्रत्यक्षात उतरू शकते, जर तसा प्रयत्न केला तर.
विषमतेवर आधारित म्हणजेच आर्थिक विषमता सामाजिक विषमता धार्मिक सांस्कृतिक राजकीय विषमता सगळीच विषमता उध्वस्त करून प्रत्येक क्षेत्रात समता प्रस्थापित करण्यासाठी उचललेले पाऊल म्हणजेच व्यवहारातील स्वप्न म्हणजेच जागृत अवस्थेतील स्वप्न पाहणे होय. म्हणून माणसाने निद्रित अवस्थेतील स्वप्न पाहण्यापेक्षा जागृत अवस्थेतील स्वप्न पाहणे अधिक उपयोगाचे होईल.
अर्थात जागृत अवस्थेतील स्वप्न साकार कसे करायचे यावर मात्र गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, आणि एकदा का विचार करायला सुरुवात केली तर हे स्वप्न नक्कीच साखर झाल्याशिवाय राहणार नाही.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक : 11 डिसेंबर 2025. फोन : 9420912209.


