Home Maharashtra ऊस हंगामासाठी ट्रॅक्टर-ट्रॉल्यांच्या दुरुस्तीला वेग, ट्रॅक्टर ट्रॉलीला वेल्डिंग करण्यासाठी शॉप मध्ये जोरदार...

ऊस हंगामासाठी ट्रॅक्टर-ट्रॉल्यांच्या दुरुस्तीला वेग, ट्रॅक्टर ट्रॉलीला वेल्डिंग करण्यासाठी शॉप मध्ये जोरदार तयारी चालु,  ऊस हंगाम 2025-26 साठी जोमाने तयारी सुरू…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

        गणेशवाडी तालुका इंदापूर येथे ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टर ट्रॉली दुरुस्तीच्या कामाला चांगलीच गती मिळालेली आहे.

         साखर कारखान्यांचा ऊस हंगाम (साखर ऊस गळीत हंगाम) 2025-26 अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेला असताना, ऊस वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉल्यांच्या दुरुस्तीला वेग आला आहे.

        गावोगावी वेल्डिंग शॉप्स, मॅकेनिक गॅरेजेस आणि टायर दुकांनांमध्ये उसळलेली गर्दी पाहून हंगामाची चाहूल स्पष्ट जाणवते. ट्रॅक्टर मालक ट्रॉलीचे ब्रेक, लाइट, चाके, हायड्रॉलिक सिस्टिम आणि रंगरंगोटी यावर भर देत आहेत.

वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी सज्जता…

             यंदा साखर कारखान्यांकडून वाहतूकदारांना वेळेवर वाहतूक परवाने मिळावे आणि रस्ते अपघात टळावेत यासाठी ट्रॉलीची योग्य दुरुस्ती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळेच मालक आणि चालक मंडळी वाहनांच्या टेक्निकल कामांकडे अधिक गांभीर्याने पाहताना दिसत आहेत. शेतकरी वर्ग देखील सज्ज

         ऊसतोडणीची तयारीसाठी अंतिम टप्प्यात ट्रॅक्टर व ट्रॉलीची कामे असून, शेतकरी वर्ग देखील वाहतुकीची आखणी करत आहे. ट्रॅक्टर-ट्रॉल्यांची वेळेवर उपलब्धता करून ऊस वेळेवर कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

        हंगामाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मॅकेनिक, वेल्डर आणि स्पेअर पार्ट विक्रेत्यांना चांगली कामाची संधी मिळत आहे. 

            ऊस हंगाम जवळ आला, ट्रॅक्टर-ट्रॉली सज्ज होऊ लागल्या – आता फक्त साखर कारखान्याच्या तयारीची प्रतीक्षा आहे.