आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मदतीने मिळाले रुग्णांना वेळेत उपचार…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

     आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मदतीने मिळाले रुग्णांना वेळेत उपचार प्राप्त माहितीनुसार,काल आष्टी येथे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आढावा बैठक घेतली.

      ही बैठक आटोपल्यानंतर युवा नेते अमोल कुळमेथे हे गडचिरोलीला परत येत असतांना B.Sc कॉलेजच्या काही अंतरावर दोन वाहनांचा अपघात होऊन त्यातील दिलीप बारसागडे हे गंभीर जखमी झाले.याची माहिती आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना मिळताच त्यांनी लगेच अमोल कुळमेथे यांना जखमींना ताबडतोब उपचार मिळवुन देण्याचे आदेश दिले.

       तसेच आज शनिवार ला गुरवळा येथील किर्तीमंत सुदामा बारसागडे यांना गळ्याचा आजार झाला परंतु डॉक्टर त्यांना उपचार देण्यास विलंब करीत होते.त्यामुळे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या आदेशानुसार युवा नेते अमोल कुळमेथे व विहीरगाव ग्रामपंचायतचे सदस्य निखील बारसागडे यांनी धावपळ करुन रुग्णांना वेळेत उपचार मिळवुन दिले.याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे आभार मानले.