अल्पवयीन मुलीला पळवून नेले,गुन्हा दाखल… — माहिती देण्याचे आवाहन..

 

डॉ.जगदिश वेन्नम

    संपादक

       एलीया मोहन कोत्तूरी या युवकांनी एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले असल्याची घटना समोर आली आहे. 

             एलीया मोहन कोत्तूरी यांच्या विरोधात दिनांक ३० में २०२३ उप पोलीस स्टेशन बामणी येथे दाखल अपराध क. ०६ / २०२३ कलम ३६३ भादंवि अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

       नमुद गुन्ह्याची थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे की,नमुद घटना तारखेस वेळेस व ठिकाणी यातील फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासह दिनांक २४/०५/२०२३ रोजी मौजा टेकडा ता. सिरोंचा जि. गडचिरोली येथे त्याच्या – साल्याच्या मुलीच्या कानटोचनीचे कार्यक्रमासाठी आलेले होते.

  गुन्हा दाखल असलेला युवक

           कार्यक्रम संपल्यानंतर फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह साल्याच्या घरी झोपी गेले होते. दिनांक २५ में २०२३ रोजीचे पहाटे ०१/०० वा. ते ०७/०० वा. चे दरम्यान फिर्यादीची लहान मुलगी नामे अश्विनी कोत्तुरी वय १७ वर्ष हि अल्पवयीन असल्याचे माहित असतांना सुध्दा तिला आरोपी नामे एलीया मोहन कोत्तुरी वय २१ वर्ष रा कलमलपेठा ता. वेमनपल्ली जि. मंचेरियाल ( तेंलगाना राज्य ) याने फिर्यादी हे झोपलेले असतांना त्यांच्या सम्मती शिवाय त्यांच्या ताब्यातुन त्यांच्या लहान मुलीला फुस लावुन पळवुन नेवुन तिचे अपहरन केले.

       तकारीवरून उप पोस्टे बामणी येथे वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली नमुद आरोपी विरूध्द नमुद अपराधानुसार व कलमानुसार गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.सदर गुन्ह्याचा तपास पो.उपनिरीक्षक दिपक पारधे हे करीत आहेत.

नमुद गुन्ह्यात अपहरण झालेल्या मुलीचे वर्णन खालील प्रमाणे..

कु.अश्विनी चिन्नामधुकर कोत्तुरी वय १७ वर्ष, शिक्षण ११ वी अंदाजे उंची ५ फुट, रंग – • गोरा, शरीर बांधा सडपातळ, केस काळे, नाक लांब सरळ, डोळे काळे पांढरे, अंगावरील – – – – – कपडे आकाशी रंगाचा शलवार आणि पांढ-या रंगाची लॅगीन. बोली भाषा तेलगु, हिंदी, इंग्रजी आहे.

     नमुद गुन्ह्यातील अपहरन झालेली मुलगी व नमुद गुन्ह्यातील आरोपी हे आपल्याला मिळुण आल्यास उप-पोलीस स्टेशन बामणी येथे संर्पक साधावा अथवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संर्पक साधावा किंवा खालील नमुद मोबाईल क्रमांकावर संर्पक साधावा असे आवाहन केले आहे.

संर्पक कंमाक :-

१) सहायक पोलिस निरीक्षक उप पोस्टे बामणी मो. क. – मदन एम. मस्के,संपर्क क्रमांक :- ९४२१९२३२४४

२) पोलिस उपनिरीक्षक दिपक पारधे सा. – उप पोस्टे बामणी मो. क्र. ९६५७७०८१३८