देशाचे भविष्य व्यर्थ भांडखोर व जनतेला सातत्याने भ्रमित करणाऱ्या अयोग्य व्यक्तींच्या हातात देण्या ऐवजी तरुण पोरांच्या हातात द्यावे.:- संविधान मोहोड.. — निवडणूकीचे वेध..

 

कैलास गजबे

  कारजगाव

     लोकप्रतिनिधी म्हणजे नागरिकांचे भविष्य आणि जिवंत लोकशाही.नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विधानसभेत आमदारांनी व लोकसभेत खासदारांनी मांडणी करावी आणि त्यांच्या उन्नतीसंबंधाने निधी खेचून आणण्यासाठी सातत्याने संघर्ष करावा हे अपेक्षित असते.

      मात्र,लोकप्रतिनिधी नागरिकांच्या सार्वभौमत्व हितासाठी काहीच करीत नसतील तर अशा लोकांना (लोकप्रतिनिधींना) निवडून देणे ही मतदारांची सर्वात मोठी घोडचूक ठरते.म्हणूनच खासदारांच्या माध्यमातून देशाचे भविष्य तरुण पोरांच्या हातात देण्यास हरकत नसावी अशा पध्दतीचे मत संविधान मोहोड यांचे आहे.

         मागील १५ वर्षा पासुन अमरावती येथील खासदार- आमदार यांनी किती लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिले व किती उघोग उभारले व उभारण्यासाठी प्रयास केले काय? तसेच मतदारापैकी किती युवक युवती यांचे भविष्याबद्दल पुढाकार घेत त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली ? किती आरोग्य शिक्षण व पायाभुत सुविधा मिळवून दिल्या ? किती आमदार – खासदार समाजावर अन्याय अत्याचाराविरुध्द उभे राहीले ? आता याच आत्मपरिक्षण करावे लागेल आणि यामुळेच समाजातील सुशिक्षित लोकांनी पुन्हा त्यानांच निवडुन देण्याचा आग्रह करु नये.

           तसेच येणाऱ्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युवा पिढीने पुढाकार घेवून परिवर्तन करत लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उसंडी घेत दुषीत राज्यकर्त्यांना घरी बसवावे,अशा प्रकारची विनंती पुर्वक आर्त हाक अमरावतीच्या सर्व मतदार बंधु आणि भगिनींना संविधान मोहोड यांची आहे.

       तद्वतच त्यांनी होतकरु व उच्चशिक्षित युवक युवती यांच्या पाठीशी सर्व नागरिकांनी खंबीरपणे उभे राहावे असे प्रतिपादन संविधान मोहोड यांनी केले.