प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
विषमतावादाला, समतेत,बंधुत्वात,न्यायात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यात परिवर्तित करुन भारतातील महिला/पुरुषांना,,”जातीयवादी/वर्णवादी,हिन प्रवृतीतून बाहेर काढत,सर्वांच्या अधिकाराचे,आदराचे,आकलन मानविय दृष्टीकोनातून केले.
तद्वतच संपुर्ण जगाला माणुस कसा असावा आणि माणुसकी कशी जपावी यासंबंधाने आपल्या सखोल वैचारिक शिंध्दातातंर्ग आणि सामाजिक,देशहित,लोकहित अशा महान कार्यातंर्गत प्रेरणा देत,या भारताच्या थोर सुपुत्राने विश्वाला सर्वोत्तम व सर्वश्रेष्ठ दिशा दिली.
एवढेच काय तर सर्वोच्च लोकहिताचे,देशहिताचे,समाजहिताचे मार्ग खुले करुन दिले.यामुळे थोर समाजसुधारक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार जगातील स्त्रि व पुरुषांवर आहेत.
युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतावादी वर्ण व धर्म कार्यपध्दतीवर व त्यातंर्गत जातीयवादी व्येवस्थेवर हल्ला केला,तो भारत देशातील सर्व स्त्रियांना आणि बहुजन म्हणजे या देशातील मुल निवासी पुरुषांना मनुस्मृती अंतर्गत वर्णव्यवस्थेच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी!…
भारत देशात संविधान येण्याआधी,भारत देशातील बहुजनांचं,अस्पृश्यांचं,समस्त स्त्रियांच जग हे गुलामीच जग होत,हे एक कटू वास्तव आहे.
त्यांचं जग समृद्ध करण्यासाठी आणि त्यांना स्वत:चे अस्तित्व खुले करण्यासाठी,त्यांचं उज्वल भविष्य खुलं करण्यासाठी,त्यांचं जग बदलण्यासाठी,उभे राहिलेले महामानव,मुक्तीदाता डॉ.बाबासाहेब आंबेडकर होत.
तद्वतच या सत्याचा घोट विषमतावादी विचारातंर्गत जगणाऱ्या लोकांना,”विषारी, वाटत असला तरी भारत देशातील सर्व महिला-पुरुषांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच मुक्तीदाता आहेत,हे भारत देशातील महिला-पुरुषांनी वेळीच समजून घेतले पाहिजे.
अन्यथा परत मनुस्मृती अंतर्गत वर्णव्यवस्थेच्या व धर्मव्यवस्थेच्या जोखळात फसून,जातीयवादाचे पालणपोषण करण्यासाठी गुलाम बनाल आणि अधिकार गमावून बसाल,हे तितकेच खरे आहे.
अधिकार गमावलेले लोक सर्व प्रकारचे गुलाम असतात.त्यांना स्वत:च्या विचारानुसार,स्वत:च्या इच्छानुसार,स्वत:च्या आचरणानुसार,स्वत:च्या भुमिकानुसार जगण्याचा अधिकार राहातं नाही.
यामुळे परावलंबत्वाची व गुलामीची कल्पना करताना मानवी मनाला वारंवार हादरे बसायला पाहिजे,”तेव्हाच त्यांना गुलामगिरीतून मुक्त करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर,”त्यांच्या डोक्यात घुसतील!..
भारत देशातील महिला पुरुषांचे उत्तम जिवन व उज्वल आयुष्य घडविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य वाहिलं.नव्हे तर त्यांचे अस्तित्व निर्माण करुन देण्याचे कामच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलय,हे समजून घेण्यास वेळ लागला तर भारत देशातील महिला-पुरुष स्वत:चे अस्तित्व,अधिकार गमावून बसतील!…
तद्वतच डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगभरातील शोषीत,अन्यायग्रस्त,अत्याचारग्रस्त,अधिकारविहिन,वंचितांच्या न्यायाचे प्रतीक आहेत हे भारत देशातील महिला-पुरुषांनी,विद्यार्थ्यांनी, युवक-युवतींनी,बेरोजगारांनी,मजुरांनी,अधिकाऱ्यांनी,कर्मचाऱ्यांनी,शेतकऱ्यांनी,सर्व जाती धर्मातील लोकांनी लक्षात वेळीण घेतले पाहिजे आणि,वेळीच समजून घेतले पाहिजे..
मानसामानसात भेदभाव करणाऱ्या विषमतेच्या विरोधात,गुलामगिरीच्या विरोधात,जातीयवादाच्या विरोधात,वर्णव्यवस्थेच्या व धर्मव्येवस्थेच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लढले,संघर्ष केला आणि भारत देशातील सर्व स्त्रियांना व सर्व मुलनिवासी पुरुषांना,” मनुस्मृती कायदा अंतर्गत वर्णव्यवस्थेच्या गुलामगिरीतून मुक्त केले,त्यांना अधिकार मिळवून दिले.
यामुळेच भारत देशातील विशिष्ट संघटनांचे प्रमुख,पदाधिकारी व कार्यकर्ते,स्वत:ला उच्चवर्णिय समजणारे विशिष्ट जातीचे लोक,काही राजकीय पक्षांचे मानसिक गुलाम लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सातत्याने विरोध करताना दिसतात,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे फोडताना दिसतात,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत द्वेष पसरविण्याचे काम करताना दिसतात.
भारत देशातील स्त्रि-पुरुषांना,”डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी,”मनुस्मृती अंतर्गत वर्णव्यवस्थेच्या जोखळातून बाहेर काढले,गुलामगिरीतून मुक्त केले,त्यांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे अधिकार बहाल केले,हेच भारत देशातील उच्चवर्णीयांना आणि काही मानसिक गुलाम-दलालांना पचनी पडत नसल्याचे दिसून येत आहे.
म्हणूनच ते सरळ व आडमार्गांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत नेहमी द्वेष पसरवणारी गरड ओकतात.गरड यासाठी ओकतात की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशातील समस्त स्त्रियांच्या व पुरुषांच्या सर्वोत्तम हिसासाठी केलेल्या कार्याला,संघर्षाला,ते समजून घ्यायला नकोय..
आपल्या ज्ञानाच्या,कर्तृत्वाच्या,संघर्षाच्या जोरावर जगातील सर्वात मोठ्या जनसमुदायाची काळजी घेणारा खंबीर बाप डाॅ.बाबासाहेब आंबेडकर झाले,अन् लेकरांसाठी उभं आयुष्य वाहणारी आई सुध्दा ते झालेत.हे भारत देशातील स्त्रि-पुरुष केव्हा समजून घेतील?
“वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी ते जगातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी व जगमान्य थोर समाजसुधारक,प्रकांड पंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरले,न्यायाचे सर्वोत्तम प्रतीक ठरले,हेच भारतासाठी व भारतवासियांसाठी महत्त्वपूर्ण देणं आहे..
तद्वतच जगमान्य थोर अर्थतज्ञ असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन व्यवस्थेत रुपयाची किंमत नसलेल्या समाजात जन्माला येऊन,”भारत देशातील रुपयाच्या समस्येचे सविस्तर विश्लेषण केले अन् रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पाया घातला,हे तर भारत देशातील महिला पुरुषांच्या जिवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचे ठरले.”याकडे भारतीयांना दुर्लक्ष करता येत नाही..
भारतात ‘महामानव’ ही पदवी प्रामुख्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी वापरली गेली आहे.ज्यांनी आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने,समाजसुधारक कार्याद्वारे,शोषित आणि पीडित समाजाला न्याय मिळवून दिला आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून समानता व माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला,अशा थोर नेतृत्वाला महामानव म्हटले जातय,”याची जाणीव भारतीय नागरिकांना आहे.


