नवजीवन सीबीएसई मध्ये ‘कांतीसुर्य’ यांची जयंती साजरी… 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

         साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश स्कुल.  (सीबीएसई) साकोली येथे थोर विचारवंत, मराठी लेखक आणि समाज सुधारक महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मा. मुजम्मिल सय्यद, पर्यवेक्षिका शर्मिला कछवाह, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास व विनोद किरपान उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात कांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सय्यद यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुलेच्या जिवनचरित्राविषयी माहितीत सांगितले की महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तसेच शेतकरी व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्र स्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली होती. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे ज्योतिबा यांना जनतेने ‘महात्मा’ ही उपाधी बहाल केली होती असे सांगितले. विद्यार्थ्यांनी ज्योतिबांचे आदर्श घेउन समाज कार्यात व देश विकास कार्यात सहयोग करावे असे आव्हान प्राचार्य सय्यद यांनी केले आहे. कार्यक्रमाचे संचालन लता चांदेवार व आभार माधुरी हलमारे यांनी केले. कार्यक्रमाकरिता सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.