ब्रेकिंग न्यूज…वैरागड येथील आयडीया मोबाईल टॉवर जवळ दुचाकीची समोरासमोर धडक….. — दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार…

प्रितम जनबंधु

  संपादक 

वैरागड:- आज दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास वैरागड येथील आयडिया मोबाईल टॉवर नजीकच्या मार्गावर दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली असुन दुचाकीस्वार जागीच ठार झाला असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.

               सदर अपघातात मय्यत व्यक्ती रवींद्र ठलाल वय 45 वर्ष हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशपुर येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. ते आरमोरी येथे वास्तव्याने राहत असल्याने आपल्या MH 33 AA 9799 या दुचाकीने आरमोरीकडे जात असताना वैरागड येथील आयडिया मोबाईल टॉवर जवळ समोरून येणाऱ्या MH 34 AW 1799 या होंडा कंपनीच्या दुचाकीने अपघात झाल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

       धडक झाल्यानंतर अपघात करणारे दुसरे दुचाकीस्वार मात्र दवाखान्यात उपचार करण्याच्या बहाण्याने तिथून पसार झाले असल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. सदर अपघाताची माहीती मीडताच आरमोरी पोलीस हे घटनास्थळी दाखल होऊन सबब घटनेचा पंचनामा करून मृत्तकाला उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे हलविण्यात आले आहे. घटनेचा पुठील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.