मानव विकास सेवा बहुउद्देशीय संस्था मांगली नागपूर यांच्या सहयोगाने मांग-गारोडी विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल योग्य मार्गदर्शन.. — गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामग्री वितरित.

 

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

           कन्हान:-एम.जी.एस.संविधानिक हक्क संघटन कन्हानचे अध्यक्ष गणेश भालेकर,उपाध्यक्ष समशेर पुरवले,सचिव अर्जुन पात्रे यांच्या नेतृत्वात मानव विकास सेवा बहुउद्देशीय संस्था मांगली(नागपूर) यांच्या सहयोगाने सतरापूर कन्हान येथील मांग-गारोडी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल योग्य मार्गदर्शन दिले व गरजू विद्यार्थ्यांना वही-पेन-पेन्सिल-रबर इत्यादी शैक्षणिक सामग्री वितरित करण्यात आल्यात.

          शिक्षणाबद्दल योग्य मार्गदर्शन देऊन व संविधानाचे महत्व पटवून देण्यात आले.तसेच मांग-गारोडी समाजातील पुष्पा इंदल पात्रे या मुलीने महिलानं बद्दल शिक्षणाचे महत्त्व आपल्या भाषणातून विषद केले होते. त्यासाठी या मुलीचे कौतूक केले वही-पेन-पेन्सिल-रबर देऊन तिला सन्मानित करण्यात आलले. 

           एम.जी.एस.संविधानिक हक्क संघटन कन्हान हे सदैव आपल्या समाजासाठी प्रयत्नशील असते.त्यामधील सदस्य किरण शेंडे.आशिष इंदुरकर.लक्ष्मण पात्रे.महेंद्र पात्रे.अर्जुन गायकवाड आणि समस्त मांग-गारोडी समाजातील नागरिक मार्गदर्शन पर सभा प्रसंगी उपस्थित होते.