वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड.प्रकाश आंबेडकर याचे राजकारण योग्य दिशेने… — देशहितासह नागरिकांच्या हितसंबंधाने त्यांच्या सारखी त्यागाची भुमिका कुठल्याच पक्ष प्रमुखांना जमणार नाही… — यामागे दडलेय सर्व नागरिकांचे हित..

संपादकीय 

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

           २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम विवध पक्षांमध्ये आतापासूनच वाजायला लागली आहेत.पक्ष बांधनी बरोबर पक्षांची ताकद येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आजमावण्यासाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत.

            मात्र,महाराष्ट्र राज्यासह विविध राज्यातंर्गत केंद्रीय सत्तेच्या बदलासाठी स्वतःच्या पक्षाच्या ताकदीला समर्पित करण्यासंबंधाने खुलेआम बोलणारा त्यागी नेता एड.प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय दुसरा कुणीच महाराष्ट्र राज्यात दिसत नसल्याचे प्रखरतेने आता जाणवू लागले आहे.

          “देशातील नागरिकांविरोधातील आर.एस.एस.आणि भाजपा पक्षाच्या केंद्रीय राजवटीची हुकुमशहा व मुजोर प्रवृत्तीतील भुमिका,कार्यपद्धत आणि त्यांचे निर्णय,हे देशातील नागरिकांना देशोधडीला लावणारे आहेत आणि पुढे चालून त्यांना लाचार व गुलाम करणारे आहेत याची वास्तविक माहिती एड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आहे. 

              याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील मराठा,ओबीसी,धनगर,कोष्टी,हलबा,माना,गोवारी समाजातील नागरिकांच्या आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकार कायदेशीर भुमिका न वटवता आणि योग्य निर्णय न घेता गुडपेच डावातंर्गत एकमेकांना भडकवत असल्याचे सुध्दा एड.प्रकाश आंबेडकर यांच्या लक्षात आले आहे.

            आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्यातील गरीब मराठा व ओबीसी आरक्षण यांच्या संदर्भात वंचित प्रमुख एड.प्रकाश आंबेडकरांनी कायदेशीर माहिती सार्वजनिक रित्या सांगून महाराष्ट्र सरकारच्या तकलादू भुमिकांचे व विरोधी पक्षांच्या मायाजाळाचे पितळच उघडले पाडले आहे.

           भिमा कोरेगाव दंगल असो की महाराष्ट्र राज्यात आता आताच घडवून आणलेल्या दंगली असोत,सर्व दंगली नियोजित होत्या व या दंगलींना कुणाचे कसे पाठबळ होते?याबाबत सुध्दा सखोल माहिती एड.प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सभेंच्या माध्यमातून दिलेली आहे.

         देशाच्या स्वातत्र्या बरोबर लोकशाही गणराज्य प्रजासत्ताकला म्हणजेच देशातील सर्व नागरिकांना,”भाजपा आणि आर.एस.एस.च्या,तावडीतून वाचवीने अतिशय महत्वाचे कार्य व कर्तव्य आहेत हे वंचित प्रमुखांनी अलगद टिपल आहे.

         तद्वतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महा भ्रष्टाचारी चोर असून खोट बोलण्यात नंबरी आहे‌त,जगात भारताचे नाव त्यांनी खराब केले असून देशातील नागरिकांचे भविष्य अंधारात ढकलून मौजमजा करणारे ते मस्तवाल नेतृत्व आहेत,असे सुद्धा अनेक उदाहरणासह वंचित प्रमुखांचे म्हणणे आहे.

खाजगीकरण,कंत्राटीकरण,गावखेड्यातील शांळा बंद करण्याचे धोरण,पिक विमा कंपनीचे उदात्तीकरण हे देशातील नागरिकांना मारक ठरणारे असून शोषण करणारी भांडवलशाही निती आहे.

           भांडवलशाही निती देशातील नागरिकांना कंगाल करणारी असून विषमतावादी विचारधारेला पोषक वातावरण निर्माण करणारी आहे.भांडवलशाही कार्यप्रणाली या देशातील नागरिकांच्या मानगुटीवर वार करणारी असून त्यांना मुळासकट सुकवणारी आहे.

            केंद्राच्या व राज्याच्या भाजपा मित्रपक्ष सरकार द्वारा खाजगीकरणाच्या व कंत्राटीकरणाच्या माध्यमातून पुढे येत असलेले संभाव्य सर्व प्रकारचे धोके देशातील नागरिकांना परवडणारे नाहीत याबाबतचे संकेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड.प्रकाश आंबेडकर यांना मिळाले असल्याने ते महाराष्ट्र राज्यातील शिवसेना प्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दवराव ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार आणि महाराष्ट्र राज्यातील कांग्रेस पक्षाच्या सुत्रधारांना वारंवार सचेत करतात की तुम्ही इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घ्यावे.

              देशातील नागरिकांच्या बाबतीत संभाव्य धोके बघता महाराष्ट्र राज्यात,”भाजपाचा व त्यांच्या मित्र पक्षाचा,एकही खासदार निवडून येणार नाही याची दक्षता माजी मुख्यमंत्री उध्दवराव ठाकरे,माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार,कांग्रेस पक्षाच्या हायकमांडने घ्यावी हा उदेश एड.प्रकाश आंबेडकरांचा दिसतो आहे.

           महाराष्ट्र राज्यात इंडिया बरोबर वंचित बहुजन आघाडी युती मागे एड.प्रकाश आंबेडकरांची भुमिका हे महाराष्ट्र राज्यासह देशातील नागरिकांच्या पुढील उज्वल भविष्यासाठी ठळकपणे दिसून येत असल्याने इंडिया आघाडीतील सर्व पक्ष प्रमुखांनी वंचितला सोबत घेण्याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

           राष्ट्रीय कांग्रेस पक्ष, शिवसेना (उध्दवराव ठाकरे),राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार) यांनी आजच्या राजकीय परिस्थितीचे भान ठेवून वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्र राज्यात सोबत घेतले तर भाजपाची व त्यांच्या मित्र पक्षाची दांडी शुन्यावर उडाल्याशिवाय राहणार नाही याबद्दल एड.प्रकाश आंबेडकर आग्रही आहेत ते केवळ जनतेच्या हितासाठी…

           जनतेच्या हितसंबंधांने युतीसाठी इंडिया आघाडीला वारंवार सचेत करणारे एड.प्रकाश आंबेडकर हे दुरदृष्टीचे अचूक अनुभवी नेते असून ते हतबल नाहीत हे महाराष्ट्र राज्यातील जनतेंनी  ओळखले पाहिजे.