चिकित्सक वृत्ती आणि मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न “दैवतांची सत्यकथा” मध्ये प्रकर्षाने जाणवतो : डाॅ.बाबा आढाव… — डॉ.अशोक राणा लिखित “दैवतांची सत्यकथा” या वैचारिक ग्रंथाचे प्रकाशन…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : मूळ दैवतापर्यंत जाण्यासाठी पाश्चात्त्य ज्ञानावर परपुष्ट झालेली दृष्टी उपयोगाची नसते; तर त्यासाठी भारतीय लोकधारणांचे ज्ञान आणि लोकश्रद्धांची शक्तिकेंद्रे माहीत असणे अनिवार्य असते. डॉ.राणांची चिकित्सक वृत्ती आणि मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न सर्वच लेखांमध्ये प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे दैवतांची सत्यकथा हा ग्रंथ उपयुक्त ठरत आहे परंतु ज्यांच्या साठी या ग्रंथाची निर्मिती केली आहे त्यांच्या पर्यंत हे पोहचले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी केले.

         विश्वकर्मा पब्लिकेशन्सच्या माध्यमातून डॉ.अशोक राणा लिखित “दैवतांची सत्यकथा” या वैचारिक ग्रंथाचे प्रकाशन सोहळा नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंगला सामंत, डॉ.विश्वनाथ शिंदे, बालाजी उबाळे, विशाल सोनी, प्रतिमा इंगोले, ज्ञानेश्वर मोळक, संदीप तापकीर, शैलजा मोळक, गणेश महादेव उपस्थित होते.