Home Maharashtra विहीर लाभार्थ्यांना बांधकामांचे रुपये मिळाल्याने उपसरपंच अशोक चौधरी यांचा आत्मदहन करण्याचा निर्णय...

विहीर लाभार्थ्यांना बांधकामांचे रुपये मिळाल्याने उपसरपंच अशोक चौधरी यांचा आत्मदहन करण्याचा निर्णय मागे….

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

         श्री.अशोक ज्ञानेश्वर चौधरी,उपसरपंच ग्रा.पं.शंकरपूर यांनी,”शेतात विहिरीचे बांधकाम केलेल्या शंकरपुर येथील शेतकऱ्यांना प.स.चिमूर अंतर्गत ग्रारोहयो विभाग रुपये देत नसल्यामुळे आत्मदहन करण्याचा लेखी इशारा गटविकास अधिकारी चिमूर यांना दिला होता.

        मात्र,प.स.च्या संबधित विभागाने शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रुपये जमा केल्यानंतर उपसरपंच अशोक चौधरी यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

        चिमुर तालुक्यातील मौजा शंकरपूर येथील मागेल त्याला विहीर नरेगा अंतर्गत सिंचन विहीर ही वैयक्तीक राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत असून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने हि योजना राबविण्यात आली आहे. 

       मौजा शंकरपुर येथील वैयक्तीक विहीरीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.शेतीला सिंचनाची सोय व्हावी,गावातील मजुराना गावातच काम मिळावे या उद्देशाने शेतकऱ्यांना चार लक्ष रुपये किंमतीची सिंचन विहीर बांधकामाची योजना सुरु आहे.

      सिंचन विहीरीचे अनुदान सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून जमा केले जाते.मात्र अज्ञापही लाभार्थ्यांना सदर सिचन विहीरीचे अनुदान प्राप्त झाले नव्हते.सदर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी आर्थीक अडचणीत सापडले होते.

      मौजा शकरपुर येथील सन २०२३-२०२४ मध्ये नरेगा अंतर्गत वैयक्तीक सिंचन विहीर बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचे अनुदान १० ऑगस्ट पर्यंत अदा करण्यात यावे अन्यथा येत्या १६ ऑगस्ट २०२५ रोजी पंचायत समिती कार्यालय चिमुर चे आवारात आत्मदहन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी,पचायत समिती चिमूर याना निवेदन दिले होते.

       तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई,पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा,जिल्हाधिकारी चंद्रपूर व इतर वरिष्ठाना दिनांक १६/७/२०२५ रोजी निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आले होते.

       दिनांक १६/७/२०२५ रोजी मुख्यमंत्री म.राज्य मुंबई,पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, जिल्हाधिकारी चंद्रपूर,गटविकास अधिकारी पंचायत समिती चिमुर याना दिलेल्या अर्जाचा शासन तथा प्रशासन स्थरावर विचार केला व सिंचन विहीरीचे अनुदान सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून दिनाक २४/०७/२०२५ रोजी जमा केले.

           लाभार्थ्यांच्या खात्यात सदर योजनेचे पैसे जमा झाल्याने उपसरपंच अशोक चौधरी यांचे समाधान झाले.यामुळे पचायत समिती कार्यालय निमूर समोर करीत असलेला आत्मदहन मागे घेत असून सध्या मी आत्मदहन करणार नाही व सदर प्रकरणा वरून आत्मदहन सारखे कृत्य करणार नाही.मी आत्मदहना पासून परवृत्त होत आहे असे लेखी बयान पोलिस स्टेशन भिसी अंतर्गत पोलिस चौकी शंकरपुर येथे त्यांनी नोंदवीले आहे.